« पदाची कामना »
आपण सीएम, पीएम व्हावं
कामना ही लपून राहिलेली नाही
कुणाला रुचणार यापेक्षा
आशा त्यांची झाकून राहिलेली नाही
कार्यकत्यांची भावना ऐकून
गालात त्यांच्या खळी पडली आहे
मनातली ती गोष्ट कुणीतरी
नेमक्याच वेळी काढली आहे
मोठे पद कुणाला नकोय!
स्वार व्हायची इच्छा असते
काही करून गाठायलाच तर
त्याचा चाललेला पिच्छा असते
• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks to comment on my blog. :)