खरपूस • वात्रटिका
« शहाणपण »
उशिराने का होईना
शहाणपण सुचलं आहे
प्रतिस्पर्ध्यांला शह देतांना
मनोबलही खचलं आहे
मतदानातून गड खालसा
हा जनमताचा हल्ला आहे
जनतेत पोहचण्याचा शिपायांना
निर्वाणीचा आता सल्ला आहे
• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
१५ डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ६७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks to comment on my blog. :)