Notbandi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Notbandi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०१७

नोटबंदीची वर्षपूर्ती

नोटबंदीची वर्षपूर्ती
कधी देशभक्ती, कधी डिजीटल
तर कधी भ्रष्टाचारमुक्तीचं नाव
दिडशे लोकांनी जीव गमावुनही
विकासदर कुठं गेलाय राव?

कुणाची स्तुतीसुमनं
कुणी काळा दिवस पाळतो
भ्रष्ट, श्रीमंतचोर मात्र सेफ
शेवटी गरिबच पोळतो

रांगा लावुन, नोटा बदलून
काय साध्य झालं अंती?
भ्रष्टाचाराला आळा घालणं सोडा
अन् फसवी झाली नोटबंदी
• रघुनाथ सोनटक्के
मो. 8805791905