Yuva Chhatrapati लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Yuva Chhatrapati लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २४ मे, २०१९

निकाल

« निकाल »

निकालात कुणी हरलं आहे 
तर कुणी थोडं तरलं आहे 
कुणाची फिरली लाट 
तर कुणाचं नाणं वधारलं आहे 

कुणाचा झाला पप्पू 
कुणी झाला फेल आहे 
भ्रमनिरास झाल्याने 
सत्ताधारी मात्र ट्रोल आहे 

हरणाऱ्याने करावं चिंतन 
जिंकणाऱ्याचं गाडं हललं आहे
आत्मस्तुती सोडून जाणावं 
जनतेच्या मनात काय चाललं आहे
• रघुनाथ सोनटक्के (पुणे)

 दिवाळी अंक: https://bit.ly/ShabdRasik-2018
  ईबुक वाचा:https://bit.ly/KharpusVatratika1

२ डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ६४)
आणि दै. कोकण सकाळ मध्ये प्रकाशित
(२४ मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १९५)


Kharpus Vatratika



शनिवार, ९ मार्च, २०१९

कार्यकर्ता

खरपूस • वात्रटिका

« कार्यकर्ता »
नेहमीच कामाला लागण्याचा
कार्यकर्त्यांना सल्ला असतो
पद, लाभांवर एकमात्र
वरच्यांचाच डल्ला असतो

पक्षवाढीसाठी अतोनात
तोच एकटा झटत असतो
पक्षाला तर केवळ बिचारा
पखालीचा बैलच वाटत असतो
• रघुनाथ सोनटक्के
गुगल सर्च: 'kharpus vatratika'

(९ मार्च २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.१३४)
Vatratika

शुक्रवार, १ मार्च, २०१९

पाकवर स्ट्राईक

खरपूस • वात्रटिका

« पाकवर स्ट्राईक »

आत घुसून पाकड्यांची
नांगी कशी ठेचली आहे
शांतीवार्तेची अक्कल
आता त्याला सुचली आहे

एवढे जेरीस आणूनही
पोकळ त्याच्या धमक्या आहेत
आत घुसून मारणार्‍या
फौजा आमच्या खमक्या आहेत

इकडे कुरापती, तिकडे वार्ता
दुतोंडी त्याची चाल आहे
ना'पाक' असलेल्यांची 
आखरी हीच एक ढाल आहे
• रघुनाथ सोनटक्के
(दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.१२८)
गुगल सर्च: 'kharpus vatratika'

१ मार्च २०१९ च्या दै. बलशाली भारत  मार्च च्या दै. मराठवाडा संचारमधे प्रकाशित 

Vatratika Vatratika Vatratika

सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१९

जागावाटपात दुर्लक्ष

खरपूस • वात्रटिका

    « जागावाटपात दुर्लक्ष »
दोघा भावांनी घेतले
लाभ आपआपसात वाटून
बाकी तर 'आठवले'ही नाही
दिले त्यांना सहज लोटून

इंजिनही (आ)गाडीला
जोडायला नकार आहे
'प्रकाश' पडेना डोक्यात
ह्यांचा पक्ष काय टूकार आहे!

'विनायका'ला आळवत होते
स्वप्नं त्याचंही साकारलं नाही
शेट्टींना तर केलं बेदखल
काहीच कसं विचारलं नाही
• रघुनाथ सोनटक्के
(दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.१२४)
गुगल सर्च:* 'kharpus vatratika'


२५ फेब्रुवारी २०१९ च्या दै. मराठवाडा संचार आणि बलशाली भारत मधे प्रकाशित
VatratikaVatratikaVatratika

शुक्रवार, २२ फेब्रुवारी, २०१९

अवघड कोडं

« अवघड कोडं »

नाही म्हणता एकदाचं
कोडं अवघड सुटलं आहे
कार्यकर्त्यासोबत जनतेलाही
हायसं किती वाटलं आहे

तत्वासाठी, जनतेसाठी
कि सत्तेसाठी लाचारी आहे
सगळ्यांना कळून चूकलं
जनता तेवढी विचारी आहे

• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
  मो. ८८०५७९१९०५

२२ फेब्रुवारी २०१९ च्या दै. वाचकमंच, मराठवाडा संचार आणि बलशाली भारत मधे प्रकाशित

VatratikaVatratikaVatratikaVatratika

मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१९

शिवजयंती

« शिवजयंती »


Calligraphy by Raghunath Sontakke

तिथी काढून महाराजांनी कधी
चढला नव्हता किल्ला
साजरी करायला जंयती
मग हवा कुणाचा सल्ला

ठरवलेली तारिख ठेवा
करू नका नुसते वाद
दाखवा करून 'पराक्रम'
घालू नका नुसती साद

'विचार' आणि 'स्वाभिमान'
प्रत्येकानेच जपायला पाहिजे
राजांचा विचार शेवटी
जनतेपर्यंत पोचायला पाहिजे

त्यांचं नाव घेणं सत्तेसाठी
असतात राज्यकारण्यांचे फंडे
राज्यांचं आणुन दाखवा 'स्वराज्य'
फडकवु नका नुसते झेंडे

   • रघुनाथ सोनटक्के
     मो. 8805791905

ईबुक: https://goo.gl/aY6hVB
ब्लॉग: https://vatratika.blogspot.in
रसिकचा फेब्रुवारी अंक: https://goo.gl/RuZBEU
१९ फेब्रुवारी २०१९ च्या दै. युवा छत्रपती ला प्रकाशित 
Vatratika

बुधवार, ३० जानेवारी, २०१९

राजकारण

खरपूस • वात्रटिका

« राजकारण »
कुणाचा संघर्ष आहे
कुणाची यात्रा आहे
वेगवेगळ्या प्रवाहांची
राजकारण ही जत्रा आहे

रंगारंगाच्या पताका, झेंडे
वेगवेगळे फेटे आहेत
सम-विषम, डावे-उजवे
स्वंयघोषीत नेते आहेत

भ्रमित करणारे मुद्दे अन्
कार्यकर्त्यांची फौज आहे
अस्मितेचा चाबूक हाणत
नेतेमंडळीची मौज आहे
• रघुनाथ सोनटक्के

(३० जानेवारी २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १०२)
३० जानेवारी २०१९ च्या दै. पथदर्शी, प्रीतीसंगम, मराठवाडा संचार, वाचकमंच, बलशाली भारत मधे प्रकाशित 


VatratikaVatratikaVatratikaVatratikaVatratika

शुक्रवार, २५ जानेवारी, २०१९

घराणेशाही

खरपूस • वात्रटिका

« घराणेशाही »
हातात हात घालून
भावा-बहिणीचा संग आहे
उभारी घ्यायला पक्ष
घराणेशाहीतच दंग आहे

आजोबा, पणजोबा
आणि आता नात आहे
दशकानुदशके पकडलेली 
नेहमीचीच ही वाट आहे

मु्द्दे घेवून भांडायला
कार्यकर्ताही 'प्रिय' आहे
'सोनिया'चा दिवस पाहण्यास
सत्ता एकमात्र ध्येय आहे
• रघुनाथ सोनटक्के

(५ जानेवारी २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )
Vatratika

रविवार, २० जानेवारी, २०१९

अंधश्रद्धेचा विळखा

खरपूस • वात्रटिका

    « अंधश्रद्धेचा विळखा »
विज्ञानयुगातही भारतीयांना
अंधश्रद्धेचा विळखा आहे
धर्माला चिकटणार्‍यांना
धंदा करणार्‍यांचा पुळका आहे

स्वार्थासाठी लूट, नरबळी 
विधी हा बघा कसला आहे
भोळ्या लोकांना भुलवणार्‍यांचा
मेंदू पुरता नासला आहे
• रघुनाथ सोनटक्के

(१९ जानेवारी २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ५६)
Vatratika

शनिवार, १९ जानेवारी, २०१९

चमकोगिरी

खरपूस • वात्रटिका

« चमकोगिरी »
इलेक्शनच्या नुसत्य‍ा वार्‍याने 
नवे पंख फुटू लागतात
भावी नेत्य‍ाच्या चेल्यांकडून
नको त्या पुड्या सुटू लागतात

पैसा, गुंडगिरीचा आजकाल
जिकडेतिकडे हैदोस आहे
गल्लीतल्या दादालाही हल्ली
नेतागिरीची भारी हौस आहे

चमकोगिरी आणि चमच्यांमुळे
असल्या नेत्यांना बळ मिळते
त्यांनाही कळायला हवेच
कामाशिवाय कुठे फळ मिळते
• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
  मो. ८८०५७९१९०५

( जानेवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.७८)
Vatratika

शुक्रवार, १८ जानेवारी, २०१९

जोडतोड

खरपूस • वात्रटिका

    « जोडतोड »
फाटाफुटीचं राजकारण
परत एकदा शिजलं आहे
सुरक्षित सरकार पाडायला
नाराजांना खेचलं आहे

विरोधकांकडून स्वार्थी आमदार 
बरोबर ताडले जातात
सुत जुळवायला काही करून
आकडे असे जोडले जातात

वाकडं त्यांच्याशी म्हणून 
स्थैर्य यांना बरं वाटत नाही
काठावरचं सरकारही
अशा तोट्यांनी खरं वाटत नाही
• रघुनाथ सोनटक्के

( १७ जानेवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.९५)
( १७ जानेवारी २०१९, दै. प्रीतीसंगम, वात्रटिका क्रं.४)
Vatratika Vatratika

बुधवार, १६ जानेवारी, २०१९

बुआ भतीजा


« बुआ भतीजा »

हाताला ठेवून बाजूला
हत्ती सायकलवर बसला आहे
कमळ फुलण्याचा रस्ता
अडवून गालात हसला आहे

दिल्ली गाठायला आता
सोयीचा रस्ता राहिला नाही
बुवा भतीजा पहिल्यासारखा
खिलाडी सस्ता राहिला नाही

राजकारणाच्या पटावर
कायम कुणी शत्रू नसतो
आज जे दिसतं त्याचा
भरवसा उद्या मात्र नसतो

 • रघुनाथ सोनटक्के
     मो. ८८०५७९१९०५


    (१६ जानेवारी २०१९,  दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ९)
 (१६ जानेवारी २०१९,  दै. प्रीतीसंगम , वात्रटिका क्रं. ३)
VatratikaVatratika

मंगळवार, १५ जानेवारी, २०१९

पक्षबदलू


« पक्षबदलू »

निवडणूकीच्या तोंडावर
पक्षबदलूंची चलती आहे
निष्ठावन कार्यकर्ता डावलणे
हिच पक्षांची गलती आहे

तो निवडून येईलच
हा पक्षाचा होरा असतो
बळ वाढविण्याच्या नादात
खर्‍या कार्यकर्त्यावर सुरा असतो

 • रघुनाथ सोनटक्के
     मो. ८८०५७९१९०५


१५ जानेवारी २०१९,  दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ९
२८ जानेवारी २०१९ च्या दै. पथदर्शी मधे प्रकाशित

Vatratika Vatratika

सोमवार, १४ जानेवारी, २०१९

युतीचा गोंधळ

« युतीचा गोंधळ »

'खड्डयात गेली युती'
आता जनतेनंही मानलं आहे
भिजत घोंगडं ठेवून बाणाने
धनुष्य खुप ताणलं आहे

एकाच घरात राहून कितीदा
भांड्याला भांड लागलं आहे
त्रागुन कमळाबाईने मनात 
भलतच काही आणलं आहे

थोड्याच दिवसात गाडी
दिलजमाईकडे वळणार आहे
भांडून एवढं काय साध्य केलं
नक्की मग कळणार आहे
• रघुनाथ सोनटक्के
     मो. ८८०५७९१९०५
    (१४ जानेवारी २०१९,  दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ९)
Vatratika

रविवार, १३ जानेवारी, २०१९

निवडणूकीची वरात


निवडणूकीची वरात 

मैदान पाहून जवळ 
दहा हत्तीचं बळ आलं आहे 
एकमेकांच्या संमतीने 
मनोमिलनाचं स्थळ आलं आहे 

कुणी घेईल घटस्फोट 
कुणाचं होईल मंगल 
लवकरच पाहायला मिळेल 
पहेलवानांची दंगल 

हरेकाला वाटतं 
जनता आम्हालाच वरंल 
कितीही केली धूम जरी
विजेता कामानेच ठरंल
• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
    मो. ८८०५७९१९०५

(१२ जानेवारी २०१९,  दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ९१)
Vatratika

शनिवार, १२ जानेवारी, २०१९

राजकिय संसार

खरपूस • वात्रटिका

« राजकिय संसार »

आघाड्या आणि युत्यांचा
हरेक संसार थाटतो आहे
बळानुसार एकमेकांमधे
सोयीच्या जागा वाटतो आहे

शक्यता आणि बळाची
चाललेली ही लढत आहे
शह, कटशहाने कुणाला
मिळते थोडी बढत आहे

आता आहेत एकत्र म्हणून
'समविचारी' वाटू लागतात
सत्तेसाठी नंतर दुसर्‍याचे
पायही हे चाटू लागतात

• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
    मो. ८८०५७९१९०५

( जानेवारी २०१९,  दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ९०)
१२ फेब्रुवारी २०१९ च्या दै. पथदर्शी मधे प्रकाशित
Vatratika Vatratika

गुरुवार, १० जानेवारी, २०१९

गरिबांना आरक्षण

खरपूस • वात्रटिका


« गरिबांना आरक्षण »

आठ लाखांचे उत्पन्नवालाही 
आता 'गरीब' असणार आहे 
रोजगाराची हमी असो वा नसो 
आरक्षणाच्या कक्षेत दिसणार आहे  

उशिराच्या मंजुरीला थोडे
राजकीय रंग आले आहे 
मनमोहक निर्णय घेण्यात 
सरकार दंग झाले आहे

हे सर्व काळाच्या कसोटीवर 
खरंच आता टिकायला हवे 
गरीब-श्रीमंतातील भेद 
लवकरच मिटायला हवे  
• रघुनाथ सोनटक्के

(१० जानेवारी २०१९,  दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ८९)
Vatratika

बुधवार, ९ जानेवारी, २०१९

मंदिरप्रवेशाचा भेद

खरपूस • वात्रटिका

« मंदिरप्रवेशाचा भेद »

'ती' अंतराळात जाऊनसुध्दा
मंदिरात प्रवेश नाकारल्या जातो
समानतेचा बाणा कुठे मग
व्यवहारात बरं वापरल्या जातो?

निवाडा देवूनही दिसत नाही
प्रत्यक्षात भेद केला आहे
पुराणातील विचारांनी अजून
विवेकाला छेद दिला आहे
• रघुनाथ सोनटक्के

(९ जानेवारी २०१९,  दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ८)
११ जानेवारी २०१९ च्या दै. पथदर्शी मधे प्रकाशित 
Vatratika Vatratika

सोमवार, ७ जानेवारी, २०१९

दप्तराचं ओझं

खरपूस • वात्रटिका

  « दप्तराचं ओझं »
 
  दप्तराच्या ओझ्यासोबतच
अपेक्षांचं ओझंही वाढलं आहे
शिक्षणाच्या बाजारीकरणाने
विद्यार्थ्यांचं कंबरड मोडलं आहे

प्रतिभा, इच्छा अन् कलेला
प्रोत्साहन द्यायला हवं
स्पर्धेत नुसतं धावण्याऐवजी
खरं विद्यामृत प्यायला हवं
• रघुनाथ सोनटक्के

(७ जानेवारी २०१९,  दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ८६)
Vatratika