MNS लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
MNS लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १ नोव्हेंबर, २०१७

फेरीवाले

« खरपुस वात्रटिका »
      फेरीवाले
कुणाला हवेत फेरीवाले
कुणाला नको त्यांचा जाच
कुणी बघतं 'मराठी' आहे का?
तर कुणी करतं उगाच वाद

केलं जरी 'राज'कारण
जनतेला सारं कळतं
सत्तेशिवाय कुठं कुणाला
शहाणपण 'असं' मिळतं?

जबाबदारी झटकुन मोकळे 
होतात सत्ताधार्‍यांचे हात
जो करेल प्रवाशांची सोय
त्याला मिळेल जनतेची साथ
• रघुनाथ सोनटक्के
   मो. 8805791905