Marathi Cartoon लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Marathi Cartoon लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ३१ जुलै, २०१९

खड्डे

« खड्डे »


रस्त्यांची खड्डयांना
अन् खड्डयांची रस्त्यांन‍ा
गरज भासु लागली
माणसं चालली जीवानं
करांचा जनता भार सोसु लागली

नेमीची येतो पावसाळा
अविरत फिरणारं खड्डयांचं 'जातं'
पालिकेला काही फरक नाही
म‍ाध्यमांनी चालवलं जरी अविरत भातं

करोडो रुपये खर्चुन शेवटी काय ?
हाती पडतो मातीचा चुरा
खड्डयांनाही घ्यावा लागतो पुर्नजन्म
त्यांनाही चुकला ना फेरा
• रघुनाथ सोनटक्के
ब्लाॅग : https://vatratika.blogspot.in

 (३० जूलै २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २४९) 
Marathi Vatratika

गुरुवार, २४ जानेवारी, २०१९

वासनेचे पुजारी

वासनेचे पुजारी

फाशीच द्या त्यांना आता
जे आहेत वासनेचे 'पुजारी'
गोळ्या घाला त्या श्वापदांना
जे घालतात माणसांच्या विजारी

वाळीत टाका त्या प्रवृतींना
जे समजतात नुसतं खेळणं
भावना, जिवाशी प्रतारणा
षंढ जे जाणतात फक्त पळणं

• रघुनाथ सोनटक्के

(३ जानेवारी २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )
Vatratika

शुक्रवार, ५ जानेवारी, २०१८

वाद

« वाद »

वादही जुने आहेत
दंगली काही नव्या नाहीत
जात, धर्म आम्हाला प्रिय
माणुसकीच्या बाता हव्या नाहीत

जातीधर्माच्या नावावर
राजकारणाची पोळी भाजली जाते
उच्चनिच, पैशाने 'माणसा'ची
उंची थोडी मोजली जाते?
• रघुनाथ सोनटक्के
   मो. 8805791905
ईबुक: https://goo.gl/aY6hVB

गुरुवार, २ नोव्हेंबर, २०१७

दरवाढ

« खरपुस वात्रटिका »
दरवाढ
दरवाढीने मारला 
सामान्याच्या कमाईवर डल्ला
'विकास' झाला वेडा
जनता करायला लागली कल्ला

गावातल्या 'उज्वला'साठी
दिली गॅसची टाकी
दरवाढीने आता आणले 
सार्‍यांच्या नऊ नाकी

कधी पेट्रोल-डिझेल
आता गॅसची दरवाढ
बंद झालंच कि जवळपास
मिळालेले अनुदान
• रघुनाथ सोनटक्के
8805791905






मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७

राजीनामा

« राजीनामा »
Calligraphy - Raghunath Sontakke

विरोधकांची रेटून मागणी
आमचाही राजीनामा खिशात आहे
प्रमुखांची भक्कम पाठराखण
सत्तेचं अडकलं हाडूक घशात आहे


दबाव वाढला जरी 'त्यांच्या'वर
'प्रकाश' डोक्यात पडत नाही
स्वच्छ आमचा कारभार जरी
पारदर्शक असे काही घडत नाही


• रघुनाथ सोनटक्के©
   8805791906

शुक्रवार, २८ जुलै, २०१७

भ्रष्टा'चारा'चा पारा

« भ्रष्टा'चारा'चा पारा »
'भ्रष्टा'चे इरादे होणार ना सफल
पुत्रानेच तुम्हाला 'नमो'वलं
हातचं सारंच जाईल हळूहळू
जेवढं तुम्ही आजपर्यंत कमावलं

मार्ग आमच्या 'निती'चा

अन् जनतेच्या हिताचा आहे
'खेळ' बघा कसा जमला
प्रश्न आता बहूमताचा आहे

उघड होतील किती घोटाळे

खाली त्यांचा पारा नाही
तुरूंगात जाण्याशिवाय आता
राहिला तुम्हा कुठे 'चारा' नाही



         • रघुनाथ सोनटक्के
     8805791905

बुधवार, १२ जुलै, २०१७

मन कि बात


मन कि बात 
कुठं धुमसतं काश्मीर 
कुठं घडतं अमर'नाथ' आहे
खंबीर 'राज' असलं तरी 
जनतेला कुठं त्यांची 'साथ' आहे 

त्यांचे हल्ले, आमचे मिशन 
आमचे शहीद, त्यांना कंठस्नान आहे 
करतो आम्ही 'मन कि बात' 
परदेशातच आमचं जास्त ध्यान आहे 

सिमेवर सैनिक हुतात्मा 
शेतकऱ्याच्या गळ्यात फास आहे 
हातचं सोडून धावणारी 
रणनिती आमची 'खास' आहे 
• रघुनाथ सोनटक्के

  संपादक । रसिक ई-मॅगझिन
  ब्लाॅग: https://vatratika.blogspot.in

मंगळवार, २७ जून, २०१७

लॉकर

« खरपुस वात्रटिका »
लॉकर
Raghunath Sontakke

लॉकर मधील मुद्देमालाची 
बँकही घेत नाही आता हमी 
ग्राहकांकडूनच पैसे उकळण्याची
शक्कल आहे त्यांची नामी 

कागदपत्र, सोनं-नाणं 
ठेवतो आपला अनमोल ठेवा 
आयत्या बिळावरचा आवडतो 
बँकेला खायला मस्त मेवा 

जुनं ते सोनं हेच खरं 
आता घरात करावी का तिजोरी 
आपल्याच पैश्यावर नफा  
मग का ऐकावी त्यांची मुजोरी 
रघुनाथ सोनटक्के 

शनिवार, ६ मे, २०१७

निर्भयाचा लढा

« वात्रटिका »
निर्भयाचा लढा

निर्भयाची हत्या-बलात्कार
निर्दयी, पाशवी गुन्हा होता
शेवटपर्यंत लढली म्हणुन
देश तुझ्या पाठी उभा होता


तु दिलास लढा म्हणुन
गाजली तुझी दिल्ली
आजही असे नराधम
फिरताहेत गल्लोगल्ली


त्यांना दिल्यावर फाशी
न्याय मिळाला समजु नये
सजग राहु दे जनतेला
चेतलेली वात पुन्हा विझु नये
• रघुनाथ सोनटक्के
  8805791905
 

गुरुवार, २७ एप्रिल, २०१७

हातावर तुरी

हमीभाव

आधी म्हणायचे
पिकवा कडधान्य, तुरी
अाता मात्र हमीभावाची
शेतकर्‍याच्या गळ्यावर सुरी

आधी त्यांना कैवार होता
अाता बंधनाचा फास आहे
पिकवणार्‍याचा सातबारा गहाण
व्यापारी खातो नफ्याचा घास आहे

नाही म्हणायचं नाही
पाहिजे ते करायचं नाही
संपला काय तुमचा बारदाणा
आता काय आहे ते पण भरायचं नाही

फिकवतो त्याला
आता हमी नाही तर भाव द्या
काहीच उरलं नाही त्याच्या हाती
तुम्हीच आता त्याला नवं नाव द्या

उरलेत किती दिवस
सुधारा आता तरी
नाहीतरी देतच आहात 
नेहमीच हातावर तुरी
   
• रघुनाथ सोनटक्के
   8805791905