India लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
India लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १४ मे, २०१९

उजळणी

« उजळणी »
त्यांनी केले कांड-घोटाळे
त्यांनीच केली फाळणी
त्याच त्याच त्या रडगाण्याची
कितीदा ही उजळणी

त्यांनी केलेल्या पापांचं
फोडणार किती वेळा खापर
राजकिय फायद्यासाठी अजून
करणार किती त्याचा वापर

जुने मुद्दे उकरून कुणाचा
काय होईल फायदा?
तुम्हीही केला होता जनतेशी
विकासाचा वायदा!

त्यांनी तसं केलं म्हणुन
तुम्ही असं करू नका
तुमच्याही कामाचा हिशेब देताना
तुमचं हसं करू नका

   • रघुनाथ सोनटक्के
     मो. 8805791905
ईबुक: https://goo.gl/aY6hVB

 (१३ मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १८६) 
Vatratika

सोमवार, १९ फेब्रुवारी, २०१८

घोटाळेबाज

« घोटाळेबाज »
Calligraphy-Raghunath Sontakke

मल्ल्यासारखे रोज नवे
घोटाळेबाज निपजू लागले
देशाच्या मातीत कसे हे
असले हिरे उपजू लागले

कुणाच्या काळात सुरू होतो
कुणाच्या काळात पळून जातो
वेळीच रोखण्याचा त्यांना
मुहूर्त मात्र टळून जातो

सरकार अन् प्रशासन
चौकश्याची सर्कस खेळत राहते
खातेदार जनता मात्र
रिकामे हात चोळत राहते
• रघुनाथ सोनटक्के
मो. 8805791905
ईबुक: https://goo.gl/aY6hVB
ब्लॉग: https://vatratika.blogspot.in

शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७

चायनामेड

« चायनामेड »
वारंवार देत आहे ड्रॅगन
युध्दाचे पुत्कार

आपणही झालो 'चायनामेड'
ठाम नाही सरकार

तोडून टाका चिन्यांची 'रसद'
'स्वदेशी'चा फक्त नारा नको

आचरणातही आणा आता
इकडून तिकडे गेला नुसता वारा नको

सैनिक भिडतील सिमेवर
आपण करू डेटा 'लिक'

'भाई-भाई' करणे चूक होती
कधी घेणार आपण 'सिख' ?
• रघुनाथ सोनटक्के
  8805791905

Vatratika, Raghunath Sontakke

रविवार, १६ एप्रिल, २०१७

पाकचा उद्दामपणा

पाकचा उद्दामपणा

दहशतवादाची मुळभुमी असुनही
पाकच्या उलट्या बोंबा
हेरेगिरीचा ठपका ठेवुन फाशी
देते फक्त त्यालाच शोभा

अपहरण करून फाशी
पाकचा उद्दामपणा कायम आहे
कुरापती काढणे हा तर
त्याचा नापाक व्यायाम आहे

काय नाहीच त्या पाकमधे
करायला त्यांची हेरेगिरी
संन्याशाला देवुन फाशी
चोर करतोय बघा शिरजोरी

कळून चुकलं जगाला
कोण पाक अन् नापाक आहे
काश्मिर मिळणं अशक्य
शेवटी भारत तुमचा बाप आहे
• रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव, पुणे
  8805791905