पक्षात आता मला वाव नाही
एकच माझा 'नारा' आहे
स्वपक्षीयावर चिखल किती फेकू
त्यांच्यापेक्षा मि किती बरा आहे
विरोधात राहून किती दिवस
गात आहे स्वपक्षीयांचे गार्हाणे
उडी मारायला तयार आहे मी
थकलो आता सततच्या पराभवाने
सत्तेसाठी काहीही करू
गाऊ आता किती स्वकियांचे गार्हाणे
सुटला होता 'बाण' कधीचा
शोभेल आता 'हात' टवटवीत कमळाने
• रघुनाथ सोनटक्के
8805791905