« मराठीची दैना »
मराठीची दैना करायला
शासन काही कमी करेना
मराठी शाळांला कुलूप
म्हणे तोटा आता साहवेना
कुणी टाकतं पाट्या
कुणी जपतो बाणा
नावापुरतं 'राज'कारण
अन् कामापुरता मामा
माय सोडून मावशीला
जो तो पुजू लागला
इंग्रजी मेडियमचा बाऊ करून
संस्थाचालक सुजू लागला
बोला, लिहा अन् वाचा
मान राखा मराठीचा
झेंडा फडकवा जगी
अभिजात मायमराठीचा
शासन काही कमी करेना
मराठी शाळांला कुलूप
म्हणे तोटा आता साहवेना
कुणी टाकतं पाट्या
कुणी जपतो बाणा
नावापुरतं 'राज'कारण
अन् कामापुरता मामा
माय सोडून मावशीला
जो तो पुजू लागला
इंग्रजी मेडियमचा बाऊ करून
संस्थाचालक सुजू लागला
बोला, लिहा अन् वाचा
मान राखा मराठीचा
झेंडा फडकवा जगी
अभिजात मायमराठीचा
• रघुनाथ सोनटक्के©
मो. 8805791905
मो. 8805791905
ईबुक: https://goo.gl/aY6hVB
ब्लॉग: https://vatratika.blogspot.in
रसिकचा फेब्रु. अंक: https://goo.gl/RuZBEU
(दि ५ मे २०१८ च्या दै. 'युवा छत्रपती' या लातूरच्या दैनिकात प्रकाशित )
(दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.१२६)
२७ फेब्रुवारी २०१९ च्या दै. मराठवाडा संचार आणि बलशाली भारत मधे प्रकाशित
ब्लॉग: https://vatratika.blogspot.in
रसिकचा फेब्रु. अंक: https://goo.gl/RuZBEU
(दि ५ मे २०१८ च्या दै. 'युवा छत्रपती' या लातूरच्या दैनिकात प्रकाशित )
(दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.१२६)
२७ फेब्रुवारी २०१९ च्या दै. मराठवाडा संचार आणि बलशाली भारत मधे प्रकाशित