Yuva Chhatrapti लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Yuva Chhatrapti लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १३ नोव्हेंबर, २०१८

गर्भलिंगनिदान


स्त्रि-पुरूष समानतेचे
गातो आम्ही गाणे
बरे आहे का आमच्या राज्यात
गर्भलिंगनिदान होणे

डाॅक्टर, दलालांसोबत जन्मदाताही
वाटेकरी आहे त्या पापाचा
निर्दयीपणे कापतो गळा
जिव कुठे असतो माय-बापाचा

स्वार्थ आणि प्रथेपायी
खुडू नका कोवळी कळी
तिचा काय दोष त्यात
जातो का नाहक बळी

कसाबात अन् तुमच्यात
फरक राहिलाच कशाचा
नराधम बनुन काय लागेल
दिवा आपल्या देशाचा

• रघुनाथ सोनटक्के

१३ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ३९) 
Vatratika
  

शुक्रवार, १५ जून, २०१८

अस्पृशता

• ख र पु स । वा त्र टि का •

« अस्पृशता »
Calligraphy by Raghunath Sontakke


अस्पृशता या देशात खरं तर
रोग आहे जुना
अजुनही काही घटनांवरून
दिसतात खाणाखुणा

जात पुसली पाहिजे
भेद मिटला पाहिजे
संकुचितपणाचा वाढता दर
खरंच घटला पाहिजे

भ्रामक, भेदभावाच्या 
पुसून टाकूयात खुणा
सुपिक समाजासाठी
'माणुसकी' हाच कणा

गरिब, ज्ञानी सारीच जनता
सुखाने आता जगली पाहिजे
संतानी दिलेल्या शिकवणीसम
जनता आता वागली पाहिजे

• रघुनाथ सोनटक्के
   तळेगाव दाभाडे, पुणे 
   मो. 8805791905
शब्दरसिकचा मे अंक: https://bit.ly/RasikMay18
वात्रटिकासंग्रह: https://goo.gl/7CcLUw
दिवाळी अंक २०१७: https://goo.gl/RxRw8g

(१९ मे. २०१८ च्या 'दै. युवा छत्रपती' मधे प्रकाशित)

http://yuvachhatrapati.com/epaper/edition/294/june/page/2
Raghunath Sontakke-Yuva Chhatrapati


रविवार, १३ मे, २०१८

दंगे आणि दंगली

• ख र पु स । वा त्र टि का •
« दंगे अ‍णि दंगली »
Calligraphy by Raghunath Sontakke

धर्माच्या नावाखाली दंगली
अन् जातीजातीत दंगे
गांधी-बुध्दाच्या देशात चालले
हिंसेचे नाच नंगे

शांतीचे आम्ही पुरस्कर्ते
हिसेंच्या आहो विरूध्द
पेरतो आहोत विष
कलुषीत करण्या खुद्द

दुसर्‍यावर थोपविण्या सत्ता
हिच आमची जात
देशभक्तीच्या नावावरच
चालविला हा उत्पाद

जुलूम, स्वगान करून
आणतो माणुसकीचा आव
सत्तेच्या लोभापायी मात्र
घालतो सत्यावरच घाव

निष्पाप जीवांचे घेता बळी
माणुसकीच्या गळी सुरा
तुडवितो पायी समतेला
आणतो शांतीदूताचा तोरा

शांती, प्रेमासाठीच चढला
येशू फासावर खुद्द
पाहून आपले निचकृत्य
रडत असेल बघा बुध्द
• रघुनाथ सोनटक्के©
   मो. 8805791905

शब्दरसिकचा एप्रिल अंक: http://bit.ly/Rasik-Apr18
*वात्रटिकासंग्रह:* http://goo.gl/7CcLUw
दिवाळी अंक २०१७: https://goo.gl/RxRw8g


( मे. २०१८ च्या 'दै. युवा छत्रपती' मधे प्रकाशित)
Yuva Chhatrapti

बुधवार, ११ एप्रिल, २०१८

गुंडगिरीची लागण

ख • र • पू • स । वा • त्र • टि • का
« गुंडगिरीची लागण »
   
Calligraphy by Raghunath Sontakke

गुंड, अपक्षांच्या भरतीची 
मागणी मोठी जोरात होते
प्रत्येक पक्षात आयारामांची
एंट्री भारी तोर्‍यात होते

सच्च्या कार्यकर्त्याच्या डोक्यावर
झुंडशाहीची 'गोळी' असते
पक्ष वाढविण्याच्या नादात
श्रेष्ठींची 'दम'दार खेळी असते

निवडणूकीच्या तोंडावर गुंडाना
पक्षांकडून नेहमीच मागणी असते
सच्चा कार्यकर्त्याच्या जखमेवर
मिठाची ही कडक डागणी असते

पांढर्‍या कपड्याखाली
काळी कृत्ये झाकली जातात
कार्यकर्त्यांच्या नावाखाली
टोळकी मस्त राखली जातात

पक्षाकडून होणारी ही आयात
मतदारांनाही कळाली पाहिजे
दाताखाली चिभ चावल्याची फिलिंग 
श्रेष्ठीनांही मिळाली पाहिजे

• रघुनाथ सोनटक्के
   फोन: 8805791905
   शब्दरसिकचा मार्च अंक: https://goo.gl/NnhtL4
वात्रटिकासंग्रह: https://goo.gl/7CcLUw
दिवाळी अंक २०१७: https://goo.gl/RxRw8g

(दि ६ मे  २०१८ च्या दै. 'युवा छत्रपती' या लातूरच्या दैनिकात प्रकाशित)

मंगळवार, ३ एप्रिल, २०१८

पेट्रोल-डिझेलची दरवाढ

• ख र पु स । वा त्र टि का •
« दरवाढ »


Calligraphy by Raghunath Sontakke

पेट्रोल-डिझेल वाढलं की
नेहमीच भार ठरत असतो
सरकार अन् माफिया मात्र
आपला गल्ला भरत असतो

दर वाढला कि लगेच
बाकींचाही भाव चढत असतो
थोड्याश‍ा पैश्यांच्या वाढीने
खुप फरक पडत असतो

गरिबांच्या डोक्यावर नेहमीच
दरवाढीचा भार असतो
पैशावाल्यांना काही फरक नाही
मात्र सामान्य गारेगार असतो

उतरतो पैश्याने, चढतो रूपयाने
कसा तर्क ल‍ावल्या जातो
करवाढीच्या हातोड्याखाली
गरिबच बरा मारल्या जातो



• रघुनाथ सोनटक्के©
  मो. 8805791905


शब्दरसिकचा मार्च अंक: https://goo.gl/NnhtL4
रघुनाथ सोनटक्के यांचा वात्रटिकासंग्रह:https://goo.gl/7CcLUw
दिवाळी अंक २०१७:https://goo.gl/RxRw8g

(कविता आवडल्यास नावासह शेअर करा.)

 ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )


Vatratika

(२३ मे. २५ मे. २०१८ च्या 'दै. युवा छत्रपती' मधे प्रकाशित)
http://yuvachhatrapati.com/epaper/edition/272/may/page/4

रविवार, ११ मार्च, २०१८

वाचाळवीर

« वाचाळवीर »
Calligraphy by Raghunath Sontakke

सत्तेत आल्यावर त्यांची भाषा
बदलून जाते कशी पार!
घुसते डोक्यात सत्तेची नशा
अन् घसरून जाते जीभेची तार

काय बोलतो आहोत याचं
राहत नाही त्यांना भान
दिला होता ज्यासाठी लढा
फारकत घेतात त्यापासून छान

सत्तेत सामिल असते अशी
वाचाळांची थोडी फौज
नाव गमावायला पुरे तेवढे
यांची होत ‍असते मस्त मौज

विसरू नका भुतकाळ
जायचं आहे पुन्हा जनतेच्या दारी
सत्ता, पद गेल्यावरच कळेल
अन् पडतील बोल तुम्हाला हे भारी

  • रघुनाथ सोनटक्के©
   मो. 8805791905

ईबुक: https://goo.gl/aY6hVB
ब्लॉग: https://vatratika.blogspot.in
रसिकचा फेब्रुवारी अंक: https://goo.gl/RuZBEU

(२७ मे. २०१८ च्या 'दै. युवा छत्रपती' मधे प्रकाशित)
http://yuvachhatrapati.com/epaper/edition/274/may/page/4