ख • र • पू • स । वा • त्र • टि • का
« गुंडगिरीची लागण »
गुंड, अपक्षांच्या भरतीची
मागणी मोठी जोरात होते
प्रत्येक पक्षात आयारामांची
एंट्री भारी तोर्यात होते
सच्च्या कार्यकर्त्याच्या डोक्यावर
झुंडशाहीची 'गोळी' असते
पक्ष वाढविण्याच्या नादात
श्रेष्ठींची 'दम'दार खेळी असते
निवडणूकीच्या तोंडावर गुंडाना
पक्षांकडून नेहमीच मागणी असते
सच्चा कार्यकर्त्याच्या जखमेवर
मिठाची ही कडक डागणी असते
पांढर्या कपड्याखाली
काळी कृत्ये झाकली जातात
कार्यकर्त्यांच्या नावाखाली
टोळकी मस्त राखली जातात
पक्षाकडून होणारी ही आयात
मतदारांनाही कळाली पाहिजे
दाताखाली चिभ चावल्याची फिलिंग
श्रेष्ठीनांही मिळाली पाहिजे
• रघुनाथ सोनटक्के
फोन: 8805791905
शब्दरसिकचा मार्च अंक: https://goo.gl/NnhtL4
वात्रटिकासंग्रह: https://goo.gl/7CcLUw
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks to comment on my blog. :)