« घोटाळेबाज »
मल्ल्यासारखे रोज नवे
घोटाळेबाज निपजू लागले
देशाच्या मातीत कसे हे
असले हिरे उपजू लागले
कुणाच्या काळात सुरू होतो
कुणाच्या काळात पळून जातो
वेळीच रोखण्याचा त्यांना
मुहूर्त मात्र टळून जातो
सरकार अन् प्रशासन
चौकश्याची सर्कस खेळत राहते
खातेदार जनता मात्र
रिकामे हात चोळत राहते
• रघुनाथ सोनटक्के
मो. 8805791905
ईबुक: https://goo.gl/aY6hVB
ब्लॉग: https://vatratika.blogspot.in