Modi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Modi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २ जून, २०१९

आत्मविश्वास

• ख र पु स । वा त्र टि का •
« आत्मविश्वास »
Calligraphy by Raghunath Sontakke

अती आत्मविश्वासही कधी
चांगलाच नडून जातो
स्वत:च्या बालेकिल्यात
आपणच पडून जातो

स्वत:च्याच नादात राहून
आपलं असं हरण होतं
दोघांच्या युतीने घरातच
आपलं कसं मरण होतं

भारी पडतो आपण
जर एकीची बात असेल
होईल सार्‍यांच‍ाच विकास
जर सबका साथ असेल
    • रघुनाथ सोनटक्के©
    मो. 8805791905


ड‍ाऊनलोड ईबुक: https://goo.gl/aY6hVB
विजिट ब्लॉग: https://vatratika.blogspot.in
'रसिक'चा फेब्रुवारी अंक येथे वाचा: https://goo.gl/RuZBEU 
(३ मे २०१८ च्या कल्याण टाइम्स मध्ये प्रकाशित)
(१ जून २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २००) 

रविवार, ३ फेब्रुवारी, २०१९

अर्थसंकल्प

«वात्रटिका»

अर्थसंकल्प

चांगला विकासदर गाठण्याचा 
काय 'संकल्प' सार्थ नाही ?
कसाही खर्च केला तरी
विरोधकांच्या मते 'अर्थ' नाहीं

शेतकर्‍याचे वाढवुन उत्पन्न

रोगांच्या निर्मुलनाचा 'संकल्प' आहे
पक्षांनांही कात्रीत पकडण्याचा
'डिजीटल' प्रयत्न अल्प आहे

शेतकरी, गरिब, व्यापारी छोटे

सगळ्यांना दिला 'आधार' आहे
विरोधकांना काय वाटायचे वाटू दे
नियोजन, नितीचा हा सार आहे

• रघुनाथ सोनटक्के, ८८०५७९१९०५
(२ फेब्रुवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १०६)
Vatratika



रविवार, ६ जानेवारी, २०१९

अच्छे दिन

अच्छे दिन
अच्छे दिन यायला अजून 
बाकी वर्षे कैक 
स्वच्छ भारत मोहिम मात्र 
झाली हाय-टेक

आमच्या खात्यांमध्ये भरलं 
आम्हीच 'काळं धन'!
परदेशातलाही मिळेल पैसा 
होता आमचा भ्रम 

महागाई वाढतेय रोज 
दौरे करू द्या भरभर
मग काय निवडणूक
बाकी आहे वर्षभर 

रघुनाथ सोनटक्के 
8805791905

(५ जानेवारी २०१९,  दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ८५) 
Vatratika

सोमवार, २६ फेब्रुवारी, २०१८

रोज नवा घोटाळा

« रोज नवा घोटाळा »
Calligraphy-Raghunath Sontakke

रोज नवा बॅक घोटाळा
उघड होऊ लागला
फसवुन उद्योगपती 
सरळ पळू लागला

त्यांच्या अन् तुमच्या काळात 
मग फरक काय नक्की
'चौकीदारा'ला माहित नव्हती का
खबर याची पक्की

काळं धन तर सोडाच
आमची पुंजी लुटायला लागले
बस झाली भाषणं, वादे आता
आमचे कान फुटायला लागले
   • रघुनाथ सोनटक्के
       मो. 8805791905
ईबुक: https://goo.gl/aY6hVB
ब्लॉग: https://vatratika.blogspot.in

मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८

भजी

« भजी »
Calligraphy-Raghunath Sontakke
शंभर देशांची वारी करून
लागलं आता कळू
रोजगार म्हणून आम्हाला 
सांगताय भजी तळू

कुठे गेले ते 'अच्छे दिन'
का होता 'चुनावी जुमला'
'विकास' कुठं दिसत नाही
का नुसतं जाहिरातींचाच मामला

स्किल अन् स्टेप अप इंडिया
का होते नुसते कागदी घोडे
वेळ आली भजी तळण्याची
का समजावी तुमच्यापुढे

   • रघुनाथ सोनटक्के
    मो. 8805791905
ईबुक: https://goo.gl/aY6hVB
ब्लॉग: https://vatratika.blogspot.in

गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०१७

नोटबंदीची वर्षपूर्ती

नोटबंदीची वर्षपूर्ती
कधी देशभक्ती, कधी डिजीटल
तर कधी भ्रष्टाचारमुक्तीचं नाव
दिडशे लोकांनी जीव गमावुनही
विकासदर कुठं गेलाय राव?

कुणाची स्तुतीसुमनं
कुणी काळा दिवस पाळतो
भ्रष्ट, श्रीमंतचोर मात्र सेफ
शेवटी गरिबच पोळतो

रांगा लावुन, नोटा बदलून
काय साध्य झालं अंती?
भ्रष्टाचाराला आळा घालणं सोडा
अन् फसवी झाली नोटबंदी
• रघुनाथ सोनटक्के
मो. 8805791905

गुरुवार, २ नोव्हेंबर, २०१७

दरवाढ

« खरपुस वात्रटिका »
दरवाढ
दरवाढीने मारला 
सामान्याच्या कमाईवर डल्ला
'विकास' झाला वेडा
जनता करायला लागली कल्ला

गावातल्या 'उज्वला'साठी
दिली गॅसची टाकी
दरवाढीने आता आणले 
सार्‍यांच्या नऊ नाकी

कधी पेट्रोल-डिझेल
आता गॅसची दरवाढ
बंद झालंच कि जवळपास
मिळालेले अनुदान
• रघुनाथ सोनटक्के
8805791905






शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०१७

बुलेट विकास

  « वात्रटिका »
बुलेट विकास

सरकार आमचे सुपरफास्ट
'बुलेट' ट्रेन आणायला लागले
साधे पुल, प्लॅटफार्म नाहीत
बघा किती 'विकास' करायला लागले

हकीकत वेगळीच आहे

स्वप्नांचे इमले बांधायला लागले
घरात नाही ज्वारीचं पिठ
पुरनपोळीचे आवतन यायला लागले

जमिनीवर पाय शाबुत ठेवा

तुम्ही तर हवेत उडायला लागले!
जनतेला सोडून वार्‍यावर
कुठे सरकारधर्म पाळायला लागले?

• रघुनाथ सोनटक्के 

  मोबा. 8805791905


वऱ्हाडी रूपांतर
बुलेट ईकास

सरकार आम्चं सुपरफास्टं
'बुलेट' टेरेन आनुन राह्यले
साधे पुल, प्लॅटफार्म नाहीत
तुमीच पा किती 'ईकास' करून राह्यले

हकीकत अलगच आहे

सपनाचे ईमले बांदुन राह्यले
घरात नाही जवारीचं पिटं
अन् पुरनपोया रांदुन राह्यले

जमिनीवर पाय शाबुत ठेवा
तुमी तं हवेत उळून राह्यले!
जनतेला सोळून वार्‍यावर
कुठे सरकार धर्म पाळुन राह्यले?

• रघुनाथ सोनटक्के 

  मोबा. 8805791905

  

मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

महागाई

« खरपुस वात्रटिका »
महागाई
महागाईनं मुश्किल झालं
सर्वसामान्यांचं जीनं
जागतिकदर कमी तेलाचे
तरी जनतेच्या तोंडाला पानं

सरकार काढतंय हिस्सा
वाढताच आहे अधिभार
जनता मात्र खात आहे
तोंड दाबुन बुक्याचा मार

पैश्याने उतरतो कधी
चढतो रूपयाने तेलाचा भाव
कोणतंही सरकार बधत नाही
जरी केली कितीही कावकाव
• रघुनाथ सोनटक्के
  फोन: 8805791905
  ब्लाॅग: https://vatratika.blogspot.in

(१ जून २०१८ च्या 'दै. युवा छत्रपती' मधे प्रकाशित)
http://yuvachhatrapati.com/epaper/edition/279/june/page/2

१९ सप्टेंबर २०१८ च्या दै. पथदर्शी मध्ये प्रकाशित तसेच ५ जून २०१८ च्या दै. डहाणू मित्र मध्ये प्रकाशित 
४ जुलै २०२० दै. आदर्श महाराष्ट्र 
Vatratika, Raghunath Sontakke

शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७

चायनामेड

« चायनामेड »
वारंवार देत आहे ड्रॅगन
युध्दाचे पुत्कार

आपणही झालो 'चायनामेड'
ठाम नाही सरकार

तोडून टाका चिन्यांची 'रसद'
'स्वदेशी'चा फक्त नारा नको

आचरणातही आणा आता
इकडून तिकडे गेला नुसता वारा नको

सैनिक भिडतील सिमेवर
आपण करू डेटा 'लिक'

'भाई-भाई' करणे चूक होती
कधी घेणार आपण 'सिख' ?
• रघुनाथ सोनटक्के
  8805791905

Vatratika, Raghunath Sontakke

शुक्रवार, २८ जुलै, २०१७

भ्रष्टा'चारा'चा पारा

« भ्रष्टा'चारा'चा पारा »
'भ्रष्टा'चे इरादे होणार ना सफल
पुत्रानेच तुम्हाला 'नमो'वलं
हातचं सारंच जाईल हळूहळू
जेवढं तुम्ही आजपर्यंत कमावलं

मार्ग आमच्या 'निती'चा

अन् जनतेच्या हिताचा आहे
'खेळ' बघा कसा जमला
प्रश्न आता बहूमताचा आहे

उघड होतील किती घोटाळे

खाली त्यांचा पारा नाही
तुरूंगात जाण्याशिवाय आता
राहिला तुम्हा कुठे 'चारा' नाही



         • रघुनाथ सोनटक्के
     8805791905

बुधवार, १२ जुलै, २०१७

मन कि बात


मन कि बात 
कुठं धुमसतं काश्मीर 
कुठं घडतं अमर'नाथ' आहे
खंबीर 'राज' असलं तरी 
जनतेला कुठं त्यांची 'साथ' आहे 

त्यांचे हल्ले, आमचे मिशन 
आमचे शहीद, त्यांना कंठस्नान आहे 
करतो आम्ही 'मन कि बात' 
परदेशातच आमचं जास्त ध्यान आहे 

सिमेवर सैनिक हुतात्मा 
शेतकऱ्याच्या गळ्यात फास आहे 
हातचं सोडून धावणारी 
रणनिती आमची 'खास' आहे 
• रघुनाथ सोनटक्के

  संपादक । रसिक ई-मॅगझिन
  ब्लाॅग: https://vatratika.blogspot.in

बुधवार, २२ मार्च, २०१७

गणसंख्या

«वात्रटिका »
गणसंख्या
जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी 'खास'
बनविलेले संसदचे 'दार' आहे
लोकांचे कामे करण्यातच गुंतले
आपले खासदार फार आहे


कामकाज, चर्चेसाठी 
त्यांची 'गणसंख्या' कोअर आहे
उपस्थितीसाठी विनंती नको 
प्रत्येक खासदार त्यास जबाबदार आहे


ना बैठुंगा ना बैठने दुंगा
पण मोदीजी तुम्हावर ना'राज' आहे
सध्या 'उत्तर' जरी मिळाले
लोकसभेची चिंता जायज आहे
• रघुनाथ सोनटक्के
https://vatratika.blogspot.in येथे विजीट करा.

सोमवार, १६ जानेवारी, २०१७

चरखा आणि खादी


Modi's Picture in KVIC Calender

फिरवतो आम्हीच चरखा
आम्हीच वापरतो खादी
राजमुद्रेवरही छापु प्रतिमा
लागु नये कुणी आता नादी


खोडून काढू त्यांची प्रतिमा
अन् देऊ तशी पोज आता
भक्त आहेत माझ्या पाठीशी
बदलू कोट मग रोज आता


• रघुनाथ सोनटक्के©
8805791905

सोमवार, १२ डिसेंबर, २०१६

नोटाबंदीचा फास



काळापैशासाठी नोटाबंदी 
सामान्यांच्या लांबच लाब रांगा
सापडायला लागल्या आता
नव्या नोटांच्याही बॅगा

देशासाठी सोसा म्हणे
आणखी काही दिवस त्रास
बडे मासे शाबुत आहेत
गरिबाच्याच गळ्याला फास

घेतलाय शंभरांचा जिव
कधी येणार ह्यांना चेव
आधी देशभक्तिचं नाव
अन आता कॅशलेसच भेव

रघुनाथ सोनटक्के
8805791905