कुठं धुमसतं काश्मीर
कुठं घडतं अमर'नाथ' आहे
खंबीर 'राज' असलं तरी
जनतेला कुठं त्यांची 'साथ' आहे
त्यांचे हल्ले, आमचे मिशन
आमचे शहीद, त्यांना कंठस्नान आहे
करतो आम्ही 'मन कि बात'
परदेशातच आमचं जास्त ध्यान आहे
सिमेवर सैनिक हुतात्मा
शेतकऱ्याच्या गळ्यात फास आहे
हातचं सोडून धावणारी
रणनिती आमची 'खास' आहे