Pathdarshi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Pathdarshi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१८

घराणेशाही

खरपूस • वात्रटिका

« घराणेशाही »

राजकारणात नेत्यांची पिढी
हळूहळू घुसवली जाते
घराणेशाही पाळून यांची
लोकशाही नासवली जाते

लायक असो वा नसो
आप्तप्रेम पाळले जाते
नेतृत्वाची उणीव म्हणून
उट्टे जनतेवरच काढले जाते

सार्‍याच नेत्यांनी देशात
पिल्लांना आपल्या पोसलं आहे
मागे पळणार्‍यांच्या डोक्यात
व्यक्तिपुजेचं खुळ घुसलं आहे

• रघुनाथ सोनटक्के
तळेगाव दाभाडे, पुणे
मो. 8805791905


                    Raghunath Sontakke - Vatratika 
५ ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ८)   व ९ ऑक्टोबर २०१८ दै. पथदर्शी प्रकाशित