गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

ईडी

खरपूस • वात्रटिका
 
ईडी
सुडबुद्धी हाही सत्तेचा
महत्वाचा एक घटक आहे
विरोधकांच्या मोहऱ्यांची तिने
कायदेशीर अटक आहे

अडचणीत आणायला
साम-दाम, दंड-भेद आणि 
आता ईडी आहे
सत्ता राखण्या किंवा मिळवण्याची
हिच सोपी शिडी आहे!
रघुनाथ सोनटक्के

(२४ ऑगस्ट २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २६६)
Vatratika, Raghunath Sontakke, Marathi Vatratika



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks to comment on my blog. :)