Plantation लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Plantation लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ७ जुलै, २०१७

वृक्षारोपण

« वृक्षरोपन »



गेल्यावर्षी रोपन केलेले 
गेलेत कुठे वृक्ष ?
मागचं सपाट झालं
पुढचं कोटींचं लक्ष !


जनतेला फसवुन करू नका
पर्यावरणाचा र्‍हास
कधीतरी उघडं होईलच
तयार केलेला भास


अजुन किती शिकवणार
वृक्षसंवर्धनाचा लेसन
प्रत्येकाने लावा एक झाड
घाला वृक्षतोडीला वेसन


• रघुनाथ सोनटक्के
  संपादक । रसिक ई-मॅगझिन
  ब्लाॅग: https://vatratika.blogspot.in