Party लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Party लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१८

बंड

बंड
कधी कुणाच्या हाती 
बंडाचा झेंडा आहे
कुणी समजतोय 'दादा' 
तर कुणी गुंडा आहे

तिकिटांसाठी भरलाय 
इच्छुकाचा मेळा आहे
पक्ष बदलायत मातब्बर
कितीतरी वेळा आहे
   • रघुनाथ सोनटक्के
     ८८०५७९१९०५

१६ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )

Vatratika


सोमवार, ५ फेब्रुवारी, २०१८

मुद्दे

« मुद्दे »
Calligraphy-Raghunath Sontakke


मुद्द्यांना निवडणूकीआधी
वजन असतं भारी
तुडूंब वाहत असतात मग
आश्वासनांची खोरी
मुद्यांची चर्चा मग
वादात झडू लागते
राजकारण्यांच्या मुद्द्यांना
जनताही भाळू लागते

घोषणापत्रात मुद्दे घालून पक्ष
पुगळ्या कागदाच्या सोडू लागते
सत्तेत पोहचण्याचा हा 'अजेंडा' होता!
जनतेला नंतर कळू लागते

चांगले दिवस येतील यांची
नेहमीच जनतेला आशा असते
मतदानाच्या हक्कापुरती तेवढी
डोक्यात घुसली नशा असते

सत्तेपुढे शहाणपण चालत नाही
नेत्यांनाही पडतो मुद्यांचा विसर
खिसे भरून घेण्याशिवाय मग
सोडत नाहीत ते कसली कसर

कुणावर शिक्का मारावा
हाच खरा आता मुद्दा आहे
नाही म्हणुन सांगायचं तर
लोकशाही टिकवणं सुद्धा आहे
• रघुनाथ सोनटक्के

बुधवार, १ फेब्रुवारी, २०१७

मनसे युती

«वात्रटिका»

मनसे युती

नाही अटी, जागांबाबत
आमचा काही वाद आहे
मराठी मतांसाठी फक्त
'मन'से आमची साद आहे


स्व:ताहून टाळी देतो आम्ही
कशी बघा आली वेळ आज आहे
'उध्दवा' तुला चांगलंच माहीत
यात काय गोड 'राज' आहे

    • रघुनाथ सोनटक्के

       ८८०५७९१९०५
(आणखी वात्रटिकांसाठी https://vatratika.blogspot.in येथे विजिट द्या.)

सोमवार, ३० जानेवारी, २०१७

औकात

औकात

कुणी 'औकात' दाखविण्याची
करतो बात आहे
तर कुणी म्हणतो आम्हाला 
जनतेची साथ आहे


आम्ही त्यांना 'पाणी पाजू'
बसतो आमचा घसा आहे.

'भावां'नाही दाखवुन देवु
कारभार 'पारदर्शक' कसा आहे
     • रघुनाथ सोनटक्के
        ८८०५७९१९०५