Pakistan लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Pakistan लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १६ एप्रिल, २०१७

पाकचा उद्दामपणा

पाकचा उद्दामपणा

दहशतवादाची मुळभुमी असुनही
पाकच्या उलट्या बोंबा
हेरेगिरीचा ठपका ठेवुन फाशी
देते फक्त त्यालाच शोभा

अपहरण करून फाशी
पाकचा उद्दामपणा कायम आहे
कुरापती काढणे हा तर
त्याचा नापाक व्यायाम आहे

काय नाहीच त्या पाकमधे
करायला त्यांची हेरेगिरी
संन्याशाला देवुन फाशी
चोर करतोय बघा शिरजोरी

कळून चुकलं जगाला
कोण पाक अन् नापाक आहे
काश्मिर मिळणं अशक्य
शेवटी भारत तुमचा बाप आहे
• रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव, पुणे
  8805791905