Locker लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Locker लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २७ जून, २०१७

लॉकर

« खरपुस वात्रटिका »
लॉकर
Raghunath Sontakke

लॉकर मधील मुद्देमालाची 
बँकही घेत नाही आता हमी 
ग्राहकांकडूनच पैसे उकळण्याची
शक्कल आहे त्यांची नामी 

कागदपत्र, सोनं-नाणं 
ठेवतो आपला अनमोल ठेवा 
आयत्या बिळावरचा आवडतो 
बँकेला खायला मस्त मेवा 

जुनं ते सोनं हेच खरं 
आता घरात करावी का तिजोरी 
आपल्याच पैश्यावर नफा  
मग का ऐकावी त्यांची मुजोरी 
रघुनाथ सोनटक्के