Sarkar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Sarkar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

आपलं सरकार

« आपलं सरकार »
बाकी आहेत अजुन दोन वर्ष
आला जाहिरातबाजीला ऊत
करोडो रुपयांचं बजेट लावुन
बसवलं वेड्या विकासाचं भुत

दोनवर्षाआधीच निवडणुकीचे
ढग कसे बरसायला लागले
न केलेल्या कामाच्याही जाहिरातीत
जुने 'लाभार्थी' झळकायला लागले

प्रचाराचं पिक हंगामा आधीच
मस्त अन् जोमदार आहे
कळेलच थोड्या वर्षांनी
'आपलं सरकार' किती दमदार आहे
• रघुनाथ सोनटक्के
मो. 8805791905