Bhondu लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Bhondu लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २६ एप्रिल, २०१८

बाबा-बापूचा फास

« बाबा-बापूचा फास »
Calligraphy by Raghunath Sontakke


भक्तांच्या भोळ्या मनावर
बाबांचा बसला पक्का डेरा
मायाजाल, खुन, बलात्कार
आहे त्यांचा चेहरा खरा

मुखातच फक्त 'राम' असतो
मन‍‍ात असते भोगाची 'आस'
भोळ्या भक्तांचा होतो वापर
टाकतो मग 'बापू' गळी फास

भुलवुन तुमच्या बुध्दीला
टाकतात ते 'डेरा'
जगासमोर मात्र 'गुर्मीत' असतात
भक्तांचा होतो खेळ सारा

करू नका आपल्या भावनांचा
कुण्या बाबापुढे 'सौदा' जरा
स्वत:ला अवतार म्हणवत नाही
कधीच संत 'सच्चा' वा खरा

भक्तांचे कवच धारण करून
चालु त्यांच्या होतात रासलीला
कायद्यापुढे सारेच समान
कुणासाठी जाऊ नये तो वाकवीला

तुकवू नका कुणापुढे मान
म्हणो कुणी स्वत:ला राम वा अल्ला
नाहीतर शोषण होतच राहील
मग करा तुम्ही कितीही कल्ला

• रघुनाथ सोनटक्के
  8805791905


(दि  एप्रिल २०१८ च्या दै. 'युवा छत्रपती' या लातूरच्या दैनिकात प्रकाशित )

(दि १३ मे २०१८ च्या दै.  विदर्भ मतदार मध्ये प्रकाशित)