Tur Kharedi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Tur Kharedi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २७ एप्रिल, २०१७

हातावर तुरी

हमीभाव

आधी म्हणायचे
पिकवा कडधान्य, तुरी
अाता मात्र हमीभावाची
शेतकर्‍याच्या गळ्यावर सुरी

आधी त्यांना कैवार होता
अाता बंधनाचा फास आहे
पिकवणार्‍याचा सातबारा गहाण
व्यापारी खातो नफ्याचा घास आहे

नाही म्हणायचं नाही
पाहिजे ते करायचं नाही
संपला काय तुमचा बारदाणा
आता काय आहे ते पण भरायचं नाही

फिकवतो त्याला
आता हमी नाही तर भाव द्या
काहीच उरलं नाही त्याच्या हाती
तुम्हीच आता त्याला नवं नाव द्या

उरलेत किती दिवस
सुधारा आता तरी
नाहीतरी देतच आहात 
नेहमीच हातावर तुरी
   
• रघुनाथ सोनटक्के
   8805791905