Exit Poll लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Exit Poll लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १५ मे, २०१९

एक्झीट पोल

• ख र पु स । वा त्र टि का •
« एक्झीट पोल »
कोण होईल एक्झीट
कोण जाईल खोल
ज्याच्या त्याच्या मनात
वेगवेगळा पोल

दाखवली जाते जागा
दिली जाते चाबी
कुणी होईल पायउतार
कुणाला मिळेल गादी

शेवटी निकाल सांगतो
कुणाच्या मागे कौल
खोटे पडते तज्ञाचे मत
उरत नाही मोल
• रघुनाथ सोनटक्के©
  मो. 8805791905

शब्दरसिकचा एप्रिल अंक: http://bit.ly/Rasik-Apr18
वात्रटिकासंग्रह: http://goo.gl/7CcLUw
दिवाळी अंक २०१७: https://goo.gl/RxRw8g

(१५ मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १८८) 
Vatratika