Raghunath Sontakke लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
Raghunath Sontakke लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०
गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०
ग्रामपंचायत निवडणूक
ग्रामपंचायत निवडणूक
ग्रामपंचायतीच्या निवडणूकीनेढवळून निघालंय गावनात्यात पडतायत गट-तटअन् पैशाला येईल भाव
कालपर्यंत नांदत होतेआता विरोधी आदळआपटकाही दिवस हे सुरू राहिलवर्चस्वाचं व्यर्थ खुपट
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५
बुधवार, २३ डिसेंबर, २०२०
कोरोनाचं नवं रूप
कोरोनाचं नवं रूप
पुन्हा उघड झालंय
कोरोनाचं नवं रूप
आधी होरपळोय सारे
लाॅकडाऊनमधे खुप
कठिण गेलं होतं २०२०
जावं चांगल नववर्ष सुखाचं
घालू नका पुन्हा भेव
त्या कोरोनाच्या रुपाचं
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५
सोमवार, २१ डिसेंबर, २०२०
हक्काची लढाई
हक्काची लढाई
कृषी आंदोलनात बळींची
रोज येत आहे नवी खबर
शांततेत चाललेल्या संघर्षाची
मोजावी लागेल किंमत जबर
हक्क अन् हट्टाची दिल्लीत
पेटली आहे ही लढाई
दात्याकडे दुर्लक्ष करून
सरकार मारतंय बढाई
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५
रविवार, २० डिसेंबर, २०२०
अन्नदाता कि देशद्रोही?
अन्नदाता कि देशद्रोही?
देशाला कळून चकुलेय
खरंच कोण दलाल आहेत
अन्नदात्याला देशद्रोही ठरवणारे
भक्त खरंच कमाल आहेत!
शेतकर्यांची हयात जाते
संकटांना कितीतरी पेलत!
सार्यांचा मुकाबला करून
ऊन, वारा, थंडी झेलत
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५
शुक्रवार, १८ डिसेंबर, २०२०
सरकारचा हेका
सरकारचा हेका
शेतकर्यांच्या आंदोलनास
मिळत आहे देशाचा कल
रस्त्यावर उतरलाय तो
सोडून हातचं हल
जाणून घ्यावं त्याचं मन
नको नुसता कायद्याचा रेटा
सर्वच स्तरातून विरोध
सोडावा सरकारनेही हेका
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५
मंगळवार, ८ डिसेंबर, २०२०
कृषी कायदा आंदोलन
कृषी कायदा आंदोलन
शेतकर्याचं नुकसान करतो
केंद्राचा नवा कृषी कायदा
पिकवणारा लुबाडला जातो
होतोय मोठ्यांचाच फायदा
किमान किंमतीचा आधार
आहे फक्त आश्वासन तोंडी
गब्बर होतील दलाल त्याने
अन् व्यावसायिकांच्या झुंडी
आंदोलन असेच चालूच ठेवू
मागे आता हटणार नाही
अहंकारावर करून प्रहार
निर्धार मधेच तुटणार नाही
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५
सोमवार, ७ डिसेंबर, २०२०
साखरेचं मध
साखरेचं मध
व्यावसायिक फायद्यासाठी
दिली देशभक्तीची झालर
अस्सलतेच्या नावाखाली
चाखवली मध म्हणून साखर
आयुर्वेदिकचे नाव सांगुन
बरंच काही विकल्या जाते
आकर्षित करण्यास ग्राहकाला
फसवं लेबल लावल्या जाते
सगळंच पिवळं सोनं नाही
ना सगळेच खरेखुरे बाबा
विश्वास ठेवण्या अगोदर
सत्यताही पडताळून बघा
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५
शनिवार, ५ डिसेंबर, २०२०
तिघांचं बळ
तिघांचं बळ
पदवीधर आणि शिक्षक
जिंकुन चार मतदारसंघ
तिघांच्या एकत्र बळाने
कमळाचे उडून गेले रंग
तिनचाकी गाडीचे सरकार
उडवली वेळोवेळी खिल्ली
अशीच जर ठेवली एकी
जिंकू शकतील ते दिल्ली
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५
शुक्रवार, ४ डिसेंबर, २०२०
कोरोनाची लस
कोरोनाची लस
वाढत आहे नव्याने पुन्हा
कोरोना संसर्गाचा दर
हवं जबाबदारीचं भान
आणि प्रतिबंधावर भर
लसीची आहे प्रतिक्षा
आणि आहे प्रत्येकाचा डोळा
सगळ्यांनाच मिळावी ती
असो श्रीमंत, गरीब वा भोळा
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५
मंगळवार, १ डिसेंबर, २०२०
अन्नदात्याची दखल
अन्नदात्याची दखल
ज्याच्यापायी मिळते खायला
अन्न आणि भाकर
दात्याकडे एवढे दुर्लक्ष
अन् राजकारणासाठी वापर
त्याची घ्यावीच दखल
तोच तर आहे आधार
त्याच्यामुळेच चालतोय
हे जग आणि व्यापार
जगासाठी पिकवतो तो
त्याचे ऐकून घ्या मागणे
सत्तेच्या नशेत बरे नाही
एवढे अहकांरी वागणे
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५
सोमवार, ३० नोव्हेंबर, २०२०
शेतकर्यांची दिल्ली
शेतकर्यांची दिल्ली
भक्तांकडून उडवली जातेय
शेतकरी आंदोलनाची खिल्ली
मागण्यासांठी गाठायचीय
काही करून दिल्ली
करा पोलीस बंदोबस्त
कितीही पाण्याचा मारा
करून मुस्कटदाबी अशी
नाही सत्तेचा अहंकार बरा
हित कशात आहे आपलं
कळतं शेतकर्यांना चांगलं
अहंकारी सरकार शेवटी
काळ्याचंही आहे नमलं
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५
रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०
बिलात सुट
बिलात सुट
बिलात सुट देऊ आम्ही
सरकारने असं म्हटलं होतं
शब्दाला जागतील हे तरी
जनतेला खरं वाटलं होतं
बिलात सुट देऊ आम्ही
सरकारने असं म्हटलं होतं
शब्दाला जागतील हे तरी
जनतेला खरं वाटलं होतं
संकटकाळात जनतेला
द्या थोडातरी बरं दिलासा
का मग शब्द भुलवता हो
साेडा हात मोकळा जरासा
काहींना तर आले आहेत
भरमसाठ बिलाचे आकडे
सुधारा जरा अधिकार्यांनो
चुकलेलं पाऊल वाकडे
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५
सोमवार, ९ नोव्हेंबर, २०२०
फटाकेबंदी
फटाकेबंदीमानवतेचा दृष्टीकोनदाखवुन द्यायची संधीत्रास होऊ नये कोरोनाग्रस्तांनाम्हणून फटाक्यांची बंदी
धोकादायक ठरू शकतोरोग्यांना फटाक्यांचा धूरसरकारकडूनही निघतोयअघोषित बंदीचाच सुर
तसाही वर आलायजास्तच प्रदुषणाचा स्तरका कमीच होणारय आंनदफटाके नाही फोडले तर?• रघुनाथ सोनटक्के, पुणे मो. ८८०५७९१९०५
रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०
मागच्या दाराचा प्रवेश
मागच्या दाराचा प्रवेशजनाधार नसलेला नेता पक्षालामौल्यवान खुप ठरत असतोविधानसभा न लढता मगमागुन प्रवेश करत असतो
नियुक्तीच्या कसोटीवर तोखराखरा ठरला पाहिजेशोभेचे बाहुले न राहताविशेष प्रश्नांवर बोलला पाहिजे• रघुनाथ सोनटक्के, पुणे मो. ८८०५७९१९०५
शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२०
पत्रकारितेची आड
गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२०
पदाची रेस
पदाची रेसग्लॅमरस फेस, आयारामांना संधीकार्यकर्त्यांना मिळेल का न्याय?आधीच्यांनी घ्यायची मेहनत अन् दुसर्यांनीच खायची साय!
पद वाटणीच्या रेसमधेपुढेपुढे ते करत असतातपक्षाला मोठे करण्यातकार्यकर्ते मात्र मरत असतात• रघुनाथ सोनटक्के, पुणे मो. ८८०५७९१९०५
बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२०
दुषणे आणि सामना
दुषणे आणि सामनातो बेडूकांचा बाप आहेआणि त्याची दोन पिल्लेवाघ मारतो छक्के-पंजेआणि त्यांचे परतीचे हल्ले
कुणाचे खरे, कुणाचे खोटेहिंदुत्व काय चिज आहे!एवढे खरे कि सत्तेत जाण्याचातो दोघांचाही ब्रिज आहे
नका काढू एकमेंकाची लायकीसन्मानाने दोघांनीही वागामहाराष्ट्र हाच धर्म मानुनविकास व्हावा समान धागा• रघुनाथ सोनटक्के, पुणेमो. ८८०५७९१९०५
मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०
कांद्याची महागाई
कांद्याची महागाईकांदा महाग झाला म्हणेथोडं त्याच्याही झोळीत पडू द्यासदा तोच रडत असतोजरा स्वत:लाही रडू द्या
कळून चुकेल त्यांचं दु:खथोडी सोसा महागाईची झळतुमचं तर थोड्या दिवसांचंत्याची आहे नेहमीची कळ• रघुनाथ सोनटक्के, पुणे मो. ८८०५७९१९०५
कांद्याची महागाई
कांदा महाग झाला म्हणे
थोडं त्याच्याही झोळीत पडू द्या
सदा तोच रडत असतो
जरा स्वत:लाही रडू द्या
कळून चुकेल त्यांचं दु:ख
थोडी सोसा महागाईची झळ
तुमचं तर थोड्या दिवसांचं
त्याची आहे नेहमीची कळ
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२०
आश्वासनांची पुर्ती
आश्वासनांची पुर्ती
राज्य आहे आर्थिकदृष्ट्या
आपलं खुप आजारी
मदत करायची म्हणजे
आणखी कर्जबाजारी
राज्य आहे आर्थिकदृष्ट्या
आपलं खुप आजारी
मदत करायची म्हणजे
आणखी कर्जबाजारी
त्यांनी मारलाय टोला
यांचा उलटा पलटवार
गरजूंना हवी आश्वासनपूर्ती
नको आश्वासने भरमार
काही करून व्हायला हवी
आश्वासनांची पुर्ती
नका दाखवु बोट तुम्ही
उगीच एकमेकांवरती
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)