खरपूस • वात्रटिका
« जोडतोड »
फाटाफुटीचं राजकारण
परत एकदा शिजलं आहे
सुरक्षित सरकार पाडायला
नाराजांना खेचलं आहे
विरोधकांकडून स्वार्थी आमदार
बरोबर ताडले जातात
सुत जुळवायला काही करून
आकडे असे जोडले जातात
वाकडं त्यांच्याशी म्हणून
स्थैर्य यांना बरं वाटत नाही
काठावरचं सरकारही
अशा तोट्यांनी खरं वाटत नाही
• रघुनाथ सोनटक्के
( १७ जानेवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.९५)
( १७ जानेवारी २०१९, दै. प्रीतीसंगम, वात्रटिका क्रं.४)
( १७ जानेवारी २०१९, दै. प्रीतीसंगम, वात्रटिका क्रं.४)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks to comment on my blog. :)