सोमवार, २१ जानेवारी, २०१९

आघाडीचा जश्न

« आघाडीचा जश्न »

निवडणूकपूर्व सगळ्यांकडून 
आघाडीचा जश्न आहे
नंतर त्यातले किती उरतील
हाच खरा प्रश्न आहे!

बळ एकवटून यांना फक्त
जागा जोडायच्या आहेत
कुणी आहे चिंतेत अजूनही
कुणाला किती सोडायच्या आहेत!

• रघुनाथ सोनटक्के (पुणे)  मो. ८८०५७९१९०५
(२१ जानेवारी २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ९५ )
Vatratika

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks to comment on my blog. :)