खरपूस • वात्रटिका
« राजकारण »
कुणाचा संघर्ष आहे
कुणाची यात्रा आहे
वेगवेगळ्या प्रवाहांची
राजकारण ही जत्रा आहे
रंगारंगाच्या पताका, झेंडे
वेगवेगळे फेटे आहेत
सम-विषम, डावे-उजवे
स्वंयघोषीत नेते आहेत
भ्रमित करणारे मुद्दे अन्
कार्यकर्त्यांची फौज आहे
अस्मितेचा चाबूक हाणत
नेतेमंडळीची मौज आहे
• रघुनाथ सोनटक्के
(३० जानेवारी २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १०२)
३० जानेवारी २०१९ च्या दै. पथदर्शी, प्रीतीसंगम, मराठवाडा संचार, वाचकमंच, बलशाली भारत मधे प्रकाशित
३० जानेवारी २०१९ च्या दै. पथदर्शी, प्रीतीसंगम, मराठवाडा संचार, वाचकमंच, बलशाली भारत मधे प्रकाशित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks to comment on my blog. :)