खरपूस • वात्रटिका
« मंदिरप्रवेशाचा भेद »
'ती' अंतराळात जाऊनसुध्दा
मंदिरात प्रवेश नाकारल्या जातो
समानतेचा बाणा कुठे मग
व्यवहारात बरं वापरल्या जातो?
निवाडा देवूनही दिसत नाही
प्रत्यक्षात भेद केला आहे
पुराणातील विचारांनी अजून
विवेकाला छेद दिला आहे
• रघुनाथ सोनटक्के
(९ जानेवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ८८)
११ जानेवारी २०१९ च्या दै. पथदर्शी मधे प्रकाशित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks to comment on my blog. :)