शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१८

कांदाफेक

« कांदाफेक »

साहेबांनी सांगितलं आता 
कांदा फेकून मारायला हवा 
पडलेल्या भावाने हतबल
शेतकऱ्याला आता तारायला हवा 

हमीभावाच्या मागणीला 'सदा'
कांद्याची फोडणी दिली जाते 
संताप आणि उद्वेगाला धरून
मुद्द्याची जोडणी केली जाते

वाकतो म्हणून शेतकऱ्यालाच 
नेहमीच वाकवल्या जाते 
हमीभावाच्या गाजराने
प्रत्येकाकडूनच नागवल्या जाते 
  • रघुनाथ सोनटक्के (पुणे)
मो. 8805791905
२१ डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ७२)

Vatratika


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks to comment on my blog. :)