शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१८

आश्वासनांचा टेकू

« आश्वासनांचा टेकू »

सभांमध्ये वाट्टेल ते बोलतील
सत्य असेल याची हमी नसते
हव्या तसल्या थापा मारणार्‍या
महाभागांची काही कमी नसते

सत्तेत आल्यावर कळते कि
तो सारा जुमला असतो
याला घ्या कि त्याला घ्या
खोटेपणाचाच मामला असतो

जनतेला आपलंसं करण्यात 
प्रत्येकजणच फ़ेकू आहे 
सत्तेच्या हव्यासापोटी 
आश्वासनांचाच टेकू आहे
• रघुनाथ सोनटक्के
 मो. 8805791905

२७ डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ७७)
Vatratika

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks to comment on my blog. :)