गुरुवार, २७ डिसेंबर, २०१८

राजकीय पटल

« राजकीय पटल »

लोकप्रियता सांभाळण्यासाठी 
राजकीय पटल आहे 
कधी असेल शिखरावर 
तर पराभव अटल आहे 

आज त्यांच्या हाती सूत्रे 
म्हणून त्यांना सलाम आहे 
भ्रमात ठेवने जनतेला म्हणजे 
स्वतःच स्वतःचेच गुलाम आहे 

आदेश मानतो म्हणजे मानू नये 
तो आपला चेला आहे 
सत्तासुंदरीमुळेच हातात
हुकमाचा पेला आहे
• रघुनाथ सोनटक्के
 मो. 8805791905

२६ डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ७६) ६ जानेवारी २०१९ (दै. विदर्भ मतदार)
Vatratika Vatratika

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks to comment on my blog. :)