बुधवार, २६ डिसेंबर, २०१८

वाटेकरी

• ख र पु स । वा त्र टि का • 

« वाटेकरी »


यशाला वाटेकरी बघा 
हजारोने मिळतात 
अपयशाला पाहून लोक 
लगेचच पळतात 

लोकप्रियतेचा आलेख 
घसरत चालला आहे 
टोमण्यांच्या आडून 
नेतृत्वाला सल्ला आहे 

टिकाव लागेल एवढी 
कुणाची छाती आहे! 
आकांक्षा जोपासण्यासह
थोडीशी भीती आहे

• रघुनाथ सोनटक्के©
मो. 8805791905
२५ डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ७५)


Vatratika

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks to comment on my blog. :)