सोमवार, ३१ डिसेंबर, २०१८

जाहिरातबाजी

« जाहिरातबाजी »


निवडणूक बघून पक्षांना
आला जाहिरातबाजीचा ऊत
करोडो रुपये खर्चून
दाखवतात विकासाचं भुत

वेळेपेक्षा आधीच निवडणुकीचे
ढग कसे बरसायला लागले
जागोजागी जाहिरातींचे मोठे
फलक झळकायला लागले

प्रचाराचं पिक हंगामा आधीच
मस्त अन् जोमदार आहे
कळेलच थोड्या वर्षांनी
कोण किती दमदार आहे
  • रघुनाथ सोनटक्के
     मो. 8805791905
     ईबुक: https://goo.gl/aY6hVB

 ३१ डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ८०)
Vatratika

शनिवार, २९ डिसेंबर, २०१८

राजकिय पुर्नवसन

« राजकिय पुर्नवसन »

कधी कुणाचं पुर्नवसन होईल
काही सांगता येत नाही
पात्र असुनही वगळल्या जातं
पद मोठं मागता येत नाही

वोटबॅंक बघूनच नेत्याला
मोकळी वाट दिली जाते
वर्षानुवर्षे खर्‍या कार्यकर्त्याला
नेहमीच चाट दिली जाते
  • रघुनाथ सोनटक्के
     मो. 8805791905
     ईबुक: https://goo.gl/aY6hVB

२९ डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ७९)
Vatratika

युती कि सामना

युती कि सामना

युती व्हावी दोघांची यावेळी
दोन्ही नेत्यांची कामना आहे
रणांगणात एकमेकांना रोखने
हाच खरा 'सामना' आहे

कुठे 'देवा'च्या मन कि बात
तर कुठे तडजोडीचा 'वर्षा'व आहे
कधी युतीसाठी कुरघोडी
तर कुठे करायचा बचाव आहे

• रघुनाथ सोनटक्के©
८८०५७९१९०५

डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ७८)
१४ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ४०)
Vatratika

शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१८

आयाराम-गयाराम

खरपूस • वात्रटिका

« आयाराम-गयाराम »

आधी गेले होते सोडून
ते परत येऊ लागले
स्वगृही येताना पक्षनिष्ठेचा
दाखला देऊ लागले

निवडणूक पाहून लगेच
कसे वारे वाहू लागले
आयाराम नव्या पक्षांचे 
गाणे गाऊ लागले
• रघुनाथ सोनटक्के

  दिवाळी अंक:https://bit.ly/ShabdRasik-2018


( डिसेंबर २०१८ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )


आश्वासनांचा टेकू

« आश्वासनांचा टेकू »

सभांमध्ये वाट्टेल ते बोलतील
सत्य असेल याची हमी नसते
हव्या तसल्या थापा मारणार्‍या
महाभागांची काही कमी नसते

सत्तेत आल्यावर कळते कि
तो सारा जुमला असतो
याला घ्या कि त्याला घ्या
खोटेपणाचाच मामला असतो

जनतेला आपलंसं करण्यात 
प्रत्येकजणच फ़ेकू आहे 
सत्तेच्या हव्यासापोटी 
आश्वासनांचाच टेकू आहे
• रघुनाथ सोनटक्के
 मो. 8805791905

७ डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )
Vatratika

गुरुवार, २७ डिसेंबर, २०१८

राजकीय पटल

« राजकीय पटल »

लोकप्रियता सांभाळण्यासाठी 
राजकीय पटल आहे 
कधी असेल शिखरावर 
तर पराभव अटल आहे 

आज त्यांच्या हाती सूत्रे 
म्हणून त्यांना सलाम आहे 
भ्रमात ठेवने जनतेला म्हणजे 
स्वतःच स्वतःचेच गुलाम आहे 

आदेश मानतो म्हणजे मानू नये 
तो आपला चेला आहे 
सत्तासुंदरीमुळेच हातात
हुकमाचा पेला आहे
• रघुनाथ सोनटक्के
 मो. 8805791905

६ डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ६) ६ जानेवारी २०१९ (दै. विदर्भ मतदार)
Vatratika Vatratika

बुधवार, २६ डिसेंबर, २०१८

वाटेकरी

• ख र पु स । वा त्र टि का • 

« वाटेकरी »


यशाला वाटेकरी बघा 
हजारोने मिळतात 
अपयशाला पाहून लोक 
लगेच पळतात 

लोकप्रियतेचा आलेख 
घसरत चालला आहे 
टोमण्यांच्या आडून 
नेतृत्वाला सल्ला आहे 

टिकाव लागेल एवढी 
कुणाची छाती आहे! 
आकांक्षा जोपासण्यासह
थोडीशी भीती आहे

• रघुनाथ सोनटक्के©
मो. 8805791905
५ डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ५)


Vatratika

सोमवार, २४ डिसेंबर, २०१८

निवडणूकीआधी

• ख र पु स । वा त्र टि का • 
« निवडणूकीआधी »


Calligraphy by Raghunath Sontakke

निवडणूकीआधी एकत्र यायला हवं
सार्‍यांनाच वाटू लागते
बाकी उणीदुणी काढण्यात जातात
वेळेवर महत्व पटू लागते

कुणी म्हणतं यांच्यापासुन 
भारत-मुक्ती झाली पाहिजे
आधीच्या मतांना चिकटून राहण्याची
सक्ती झाली पाहिजे

दिशा बदलते वेळोवेळी
बदलतो कसा यांचा 'ट्रॅक'
कधी करतील घुमजाव तर
कधी करतील हायजॅक

• रघुनाथ सोनटक्के©

   मो. 8805791905
ड‍ाऊनलोड ईबुक: https://goo.gl/aY6hVB
'रसिक'चा फेब्रुवारी अंक येथे वाचा: https://goo.gl/RuZBEU
४ डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ४)
Vatratika

रविवार, २३ डिसेंबर, २०१८

अधिवेशन

« अधिवेशन »
अधिवेशन म्हणजे
मांजर-बोक्याचा खेळ आहे
काही दिवस गोंधळाचे
बाकी दोघांकडे वेळच वेळ आहे

डावपेच, कुरघोडी, बहिष्कार
या सार्‍याची खट्टीमिठी भेल आहे
कामकाज किती होईल
अंदाज आमचा पार फेल आहे
• रघुनाथ सोनटक्के
मो. 8805791905
ईबुक: https://goo.gl/aY6hVB

 डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ३)
Vatratika

शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१८

कांदाफेक

« कांदाफेक »

साहेबांनी सांगितलं आता 
कांदा फेकून मारायला हवा 
पडलेल्या भावाने हतबल
शेतकऱ्याला आता तारायला हवा 

हमीभावाच्या मागणीला 'सदा'
कांद्याची फोडणी दिली जाते 
संताप आणि उद्वेगाला धरून
मुद्द्याची जोडणी केली जाते

वाकतो म्हणून शेतकऱ्यालाच 
नेहमीच वाकवल्या जाते 
हमीभावाच्या गाजराने
प्रत्येकाकडून नागवल्या जाते 
  • रघुनाथ सोनटक्के (पुणे)
मो. 8805791905
 डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )

Vatratika


गुरुवार, २० डिसेंबर, २०१८

निकषांचा ताप

निकषांचा ताप
   
शेतकर्‍याचं कर्ज
करतो म्हणतात माफ
मागे कसा आहे मग
आत्महत्यांचा ताप

वरकरणी सरसकट आहे
छुपा निकषांचा चाप
शेतकर्‍याचं करू म्हणे भलं 
आहोत विकासाचे बाप

वादे केलेत पुर्ण आम्ही
नाही नुसती मारली थाप
सामना होईल तेव्हा होईल
तोवर करू प्रचार वारेमाप

  • रघुनाथ सोनटक्के (पुणे)
मो. 8805791905
(रोज दै. 'युवाछत्रपती'मधे प्रकाशित)

२० डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )
Vatratika

बुधवार, १९ डिसेंबर, २०१८

श्रेयवादाची लढाई

खरपूस • वात्रटिका

« श्रेयवादाची लढाई »

इलेक्शनच्या नांदीआधी
श्रेयवादाची लढाई असते
एकाच कामासाठी कधीकधी
दोघांचीही बढाई असते

भूमीपुजन करते कुणी
उद्घाटन कुणाकडून उरकल्या जाते
श्रेयवादाच्या नादात का होईना
फाईल थोडी सरकल्या जाते

  • रघुनाथ सोनटक्के (पुणे)
(रोज दै. 'युवाछत्रपती'मधे प्रकाशित)

 डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ७०)
Vatratika

मंगळवार, १८ डिसेंबर, २०१८

पदाची कामना

« पदाची कामना »

आपण सीएम, पीएम व्हावं
कामना ही लपून राहिलेली नाही
कुणाला रुचणार यापेक्षा
आशा त्यांची झाकून राहिलेली नाही

कार्यकत्यांची भावना ऐकून
गालात त्यांच्या खळी पडली आहे
मनातली ती गोष्ट कुणीतरी 
नेमक्याच वेळी काढली आहे

मोठे पद कुणाला नकोय!
स्वार व्हायची इच्छा असते
काही करून गाठायलाच तर
त्याचा चाललेला पिच्छा असते

 • रघुनाथ सोनटक्के (पुणे)
८ डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )


Vatratika

सोमवार, १७ डिसेंबर, २०१८

आयोग

खरपूस • वात्रटिका

« आयोग »

कर्मचार्‍यांसाठी आयोग
लगेच मंजूर झाला आहे
शेतकर्‍याचा स्वामिनाथन
धूळ खात पडला आहे

नोकरादारांचे लाड पुरवणे
आता अती झाले आहे
स्वातंत्र्यानंतरही उत्पादकाचे 
शोषण किती झाले आहे

• रघुनाथ सोनटक्के (पुणे)

७ डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ६८)

Vatratika


शहाणपण

खरपूस • वात्रटिका

« शहाणपण »

उशिराने का होईना 
शहाणपण सुचलं आहे
प्रतिस्पर्ध्यांला शह देतांना
मनोबलही खचलं आहे

मतदानातून गड खालसा 
हा जनमत‍ाचा हल्ला आहे
जनतेत पोहचण्याचा शिपायांना
निर्वाणीचा आता सल्ला आहे 

• रघुनाथ सोनटक्के (पुणे)

५ डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ६७)

Vatratika


शुक्रवार, १४ डिसेंबर, २०१८

राजकिय वैर

खरपूस • वात्रटिका

« राजकिय वैर »

सर्वांसमोर एकजण भोपळा
तर दुसराजण विळा असतो
मंडप मोडला की लगेच
गळ्यात यांचा गळा असतो

जनतेला दाखवायला फक्त
विळ्या भोपळ्याचं वर्तन आहे
यांचं नातं म्हणजे वरून तमाशा
आतून चालू किर्तन आहे

पक्ष, निती, नेतृत्व वेगळं
आणि फक्त राजकिय वैर आहे!
सत्तेसाठी एकत्र बसायला
म्हणे त्यात काय गैर आहे
  • रघुनाथ सोनटक्के (पुणे)
(रोज दै. 'युवाछत्रपती'मधे प्रकाशित)

   दिवाळी अंक:https://bit.ly/ShabdRasik-2018
  ईबुक वाचा:https://bit.ly/KharpusVatratika1
 डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )
Vatratika

बुधवार, १२ डिसेंबर, २०१८

सत्तेचा डाव

खरपूस • वात्रटिका

« सत्तेचा डाव »

आलटून पालटून चालू
सत्तेचा हा डाव आहे
कधी खुलते 'कमळ'
कधी 'हाता'ला भाव आहे

विकासाच‍ा मार्ग चुकून मन 
स्व-स्तुतीच्या प्रेमात पडलं
गृहीत धरणार्‍यांना वाटते
हे एकदम कसं काय घडलं!

ताकद म्हणावी पहिल्यासारखी
आता त्यांच्यात उरली नाही
बक्कळ आश्वासनांना भुलून 
जनता तिकडे फिरली नाही 

• रघुनाथ सोनटक्के (पुणे)

३ डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ६५)

Vatratika

सोमवार, १० डिसेंबर, २०१८

प्राणीहत्येवरून हिंसाचार

खरपूस • वात्रटिका

« प्राणीहत्येवरून हिंसाचार »

प्राणीहत्येच्या हिंसाचाराला
नुसतं संशयाची धार आहे
माणसांपेक्षा जनावराची दया
काहींना लागली फार आहे

धर्म, पुतळे, प्राण्यांवरून
माणसं माणसांना भीडली आहेत
राजकारण्यांच्या खतपाण्याने
चांगली डोकीही किडली आहेत
• रघुनाथ सोनटक्के (पुणे)

   मो. 8805791905

   ईबुक: https://bit.ly/KharpusVatratika1

 डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ६३)

Vatratika

शनिवार, ८ डिसेंबर, २०१८

फिशरकिंग

« वात्रटिका »

फिशरकिंग

नऊ हजार कोटी बुडविले
सतरा बॅंकांना फसुन
दारूचा किंग गेला
फिशरच्या इमानात बसुन

कर्ज दिलंच कसं त्याला
अन् बॅंकानी घेतली ठासुन
मुजोर बघा किती बोलतं
पळपुटं विदेशात घुसुन

कर्जावेळी शेतकर्‍याला सल्ला
होऊ नका देवु दुसरा मल्ल्या
सापडला कि लाल होईस्तोवर
पाहिजेत त्याच्या सोलल्या

• रघुनाथ सोनटक्के

  8805791905
(८ डिसेंबर २०१८  दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ६१)
Vatratika

आरक्षणाची मागणी

« आरक्षणाची मागणी »

ज्याला नकोय तरीही
तोही मागतो आहे
लहान पोरागत माणूस
जातीमुळे वागतो आहे

जातीजातीत अचानक
मागासपणाची वाढ झाली आहे
एकमेकांकडे बघून
इर्षा अन् द्वेषाची वाढ झाली आहे

• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
 दिवाळी अंक: https://bit.ly/ShabdRasik-2018
  ईबुक वाचा:https://bit.ly/KharpusVatratika1

१० डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ६२)
Vatratika

शुक्रवार, ७ डिसेंबर, २०१८

देवांचाही वापर

« देवांचाही वापर »

धर्म सोडून माणूसकीचा
आता जातीवर आले आहेत
देवांचाही वापर करणारे
भक्त फार झाले आहेत

देवादेवतांनाही यांनी आता
जातीजातीत वाटले आहे
मतांचा जोगवा मागायला
हरेकाने दुकान थाटले आहे

• रघुनाथ सोनटक्के (पुणे)


   दिवाळी अंक: https://bit.ly/ShabdRasik-2018
   ईबुक वाचा: https://bit.ly/KharpusVatratika1

 डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ६०)
Vatratika