खरपूस • वात्रटिका
« आकडेवारी »
सरकारची आकडेवारी
वेगळेच बोलत असते
विपरित परिस्थितीतही कांदे
नाकाने सोलत असते
ते आपलं घोडं दामटतात
दाटून बोलण्याचा रेटा असतो
वेदना आणि आक्रोश
उगीच काय खोटा असतो?
त्यांनी बोललं म्हणजे
सारं काही सत्य नसते
अंदाज बांधणार्या सगळ्याच
आकडीवारीत तथ्य नसते
• रघुनाथ सोनटक्के
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks to comment on my blog. :)