बुधवार, १३ फेब्रुवारी, २०१९

पुतळ्यांचा सवाल

खरपूस • वात्रटिका

« पुतळ्यांचा सवाल »
सरकारी खर्चाने बांधलेले
पुतळे उभे हसत आहेत
किंमत वसूल करायला
'माये'लाच पुसत आहेत

'हत्ती'वरून गुळ वाटला
आता खायचे फाके आहेत
कुणाला आले 'अच्छे' खासे
कुणाला दिन बाके आहेत

सत्तेचा दूरूपयोग करणे
प्रत्येकालाच जमले नाही
'बदला' घ्यायला बघाना
पुतळेही कुठे थांबले नाही!
• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
  मो. ८८०५७९१९०५
(१२ फेब्रुवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ११४)
Vatratika




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks to comment on my blog. :)