गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९

सैनिकहो


« सैनिकहो »
डोळ्यात तेल घालून
सीमेवर रात्रंदिन राबता
देशाच्या सुरक्षेसाठी तुम्ही
विरमरणही मागता

हौतात्म्य आलं जरी
लढत राहता तुम्ही
देशसेवेची तुमच्यात
कसलीच नाही कमी

सलाम तुमच्या सेवेला
जीवन वाहिले सर्व आहे
अख्खा देश तुमच्या पाठीशी
आम्हा तुमचा गर्व आहे
• रघुनाथ सोनटक्के

(दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.१२७)
गुगल सर्च: 'kharpus vatratika'  

२८ फेब्रुवारी २०१९ च्या दै. मराठवाडा संचार आणि बलशाली भारत मधे प्रकाशित 
१ मार्च २०१९ च्या दै. पथदर्शी मधे प्रकाशित
३ मार्च २०१९ च्या दै. विदर्भ मतदारला प्रकाशित 
VatratikaVatratika Vatratika 
Vatratika Vatratika

बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१९

मराठीची दैना

« मराठीची दैना »
Calligraphy by Raghunath Sontakke

मराठीची दैना करायला
शासन काही कमी करेना
मराठी शाळांला कुलूप
म्हणे तोटा आता साहवेना

कुणी टाकतं पाट्या
कुणी जपतो बाणा
नावापुरतं 'राज'कारण
अन् कामापुरता मामा

माय सोडून मावशीला
जो तो पुजू लागला
इंग्रजी मेडियमचा बाऊ करून
संस्थाचालक सुजू लागला

बोला, लिहा अन् वाचा
मान राखा मराठीचा
झेंडा फडकवा जगी
अभिजात मायमराठीचा

  • रघुनाथ सोनटक्के©
 मो. 8805791905


ईबुक: https://goo.gl/aY6hVB
ब्लॉग: https://vatratika.blogspot.in
रसिकचा फेब्रु. अंक: https://goo.gl/RuZBEU
(दि ५ मे २०१८ च्या दै. 'युवा छत्रपती' या लातूरच्या दैनिकात प्रकाशित )
(दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.१२६)
२७ फेब्रुवारी २०१९ च्या दै. मराठवाडा संचार आणि बलशाली भारत मधे प्रकाशित
Vatratika Vatratika

मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१९

प्रचाराचा नारळ

वात्रटिका 

« प्रचाराचा नारळ »

फुटला प्रचाराचा नारळ आता
रणधुमाळीस झाला आरंभ
तारतम्य, विवेकाने निवडावा
उमेदवार खरा आणि दंभ

कुणाचे भरले दिवस
कुणाला आलेत दिन 'अच्छे'
कुणाची तुटली 'युती' 
तर कुठे आघाडीचे धागे कच्चे

कुणाचे दावे, आश्वासने
कुणाच्या पचवाव्यात 'थापा'
मतदारांपुढे झुकतील माना आता
तर कुणी घेतील आणाभाका

• रघुनाथ सोनटक्के
८८०५७९१९०५

           
२६ फेब्रुवारी २०१९ च्या मराठवाडा संचार मधे प्रकाशित 
दै युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १२५ 
Vatratika Vatratika

सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१९

जागावाटपात दुर्लक्ष

खरपूस • वात्रटिका

    « जागावाटपात दुर्लक्ष »
दोघा भावांनी घेतले
लाभ आपआपसात वाटून
बाकी तर 'आठवले'ही नाही
दिले त्यांना सहज लोटून

इंजिनही (आ)गाडीला
जोडायला नकार आहे
'प्रकाश' पडेना डोक्यात
ह्यांचा पक्ष काय टूकार आहे!

'विनायका'ला आळवत होते
स्वप्नं त्याचंही साकारलं नाही
शेट्टींना तर केलं बेदखल
काहीच कसं विचारलं नाही
• रघुनाथ सोनटक्के
(दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.१२४)
गुगल सर्च:* 'kharpus vatratika'


२५ फेब्रुवारी २०१९ च्या दै. मराठवाडा संचार आणि बलशाली भारत मधे प्रकाशित
VatratikaVatratikaVatratika

शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१९

कोण लहान कोण मोठ‍ा

• ख र पु स । वा त्र टि का •
« कोण लहान कोण मोठा »


Calligraphy by Raghunath Sontakke

कोण लहान कोण मोठा 
आपणच ठरवू लागतो
पुशारकी मारत मारतच
स्वत:ला मिरवू लागतो

काय बोलतो काय करतो
भान आपल्याला उरत नाही
वांगी खाऊन पुराण वाचणे
मग कधीच हे सरत नाही

नको तिथे नको तेवढं
ज्ञान आपलं पाजळवू नये
बुडाखाली अंधार बघावा
तोंड आपलं उजळवू नये

कोण भिडेल आपल्याला
याचा काही नेम उरला नाही
खाऊ कुण्या बापाचा मार
याचा काही नेम उरला नाही
• रघुनाथ सोनटक्के
    तळेगाव दाभाडे, पुणे     मो. 8805791905
वात्रटिकासंग्रह: https://goo.gl/7CcLUw
शब्दरसिकचा जून-जुलै अंक: bit.ly/Rasik-June-July18

२३ फेब्रुवारी २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १२३
दै. मराठवाडा संचार आणि बलशाली भारत मधे प्रकाशित
VatratikaVatratikaVatratika


शुक्रवार, २२ फेब्रुवारी, २०१९

अवघड कोडं

« अवघड कोडं »

नाही म्हणता एकदाचं
कोडं अवघड सुटलं आहे
कार्यकर्त्यासोबत जनतेलाही
हायसं किती वाटलं आहे

तत्वासाठी, जनतेसाठी
कि सत्तेसाठी लाचारी आहे
सगळ्यांना कळून चूकलं
जनता तेवढी विचारी आहे

• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
  मो. ८८०५७९१९०५

२२ फेब्रुवारी २०१९ च्या दै. वाचकमंच, मराठवाडा संचार आणि बलशाली भारत मधे प्रकाशित

VatratikaVatratikaVatratikaVatratika

गुरुवार, २१ फेब्रुवारी, २०१९

समविचारी

« समविचारी »

दोन्ही पक्षांमधे कोणतातरी
समान एक दूवा असतो
प्रत्येकाला सत्तेचा गड
काही केल्या हवा असतो

समविचारी असलो तरी
नेतृत्व वेगळं असते
तेवढं सोडून बोललं तर
बाकी सेम सगळं असते

• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
  मो. ८८०५७९१९०५
(दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.१२)

२३ फेब्रुवारी २०१९ च्या दै. मराठवाडा संचार आणि बलशाली भारत मधे प्रकाशित 
६ मार्च २०१९ च्या दै. पथदर्शी मधे प्रकाशित


मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१९

शिवजयंती

« शिवजयंती »


Calligraphy by Raghunath Sontakke

तिथी काढून महाराजांनी कधी
चढला नव्हता किल्ला
साजरी करायला जंयती
मग हवा कुणाचा सल्ला

ठरवलेली तारिख ठेवा
करू नका नुसते वाद
दाखवा करून 'पराक्रम'
घालू नका नुसती साद

'विचार' आणि 'स्वाभिमान'
प्रत्येकानेच जपायला पाहिजे
राजांचा विचार शेवटी
जनतेपर्यंत पोचायला पाहिजे

त्यांचं नाव घेणं सत्तेसाठी
असतात राज्यकारण्यांचे फंडे
राज्यांचं आणुन दाखवा 'स्वराज्य'
फडकवु नका नुसते झेंडे

   • रघुनाथ सोनटक्के
     मो. 8805791905

ईबुक: https://goo.gl/aY6hVB
ब्लॉग: https://vatratika.blogspot.in
रसिकचा फेब्रुवारी अंक: https://goo.gl/RuZBEU
१९ फेब्रुवारी २०१९ च्या दै. युवा छत्रपती ला प्रकाशित 
Vatratika

हमल्याचं कवित्व


« हमल्याचं कवित्व »

शहिद झाले जवान
आता कवित्व राहिलं आहे
अनेकांचं बेगडीपण
देशभक्तीत पाहिलं आहे

कुणी अजून शांतीच्याच 
वाटेवर अडून आहे
संवाद समजायला कुठे
समोरचा पडून आहे!

तवा गरम भावनांचा
कुणी पोळी शेकतो आहे
ठोस कृतीची गरज पण
इशारेच फक्त ऐकतो आहे
• रघुनाथ सोनटक्के

 फेब्रुवारी २०१९ दै. युवा छत्रपती वात्रटिका क्रं. १२०
२० फेब्रुवारी २०१९ च्या दै . 'बलशाली भारत'ला प्रकाशित 
Vatratika Vatratika

शहिदांचा बदला

« शहिदांचा बदला »

सैनिकांवरील हल्ल्यामागे
तेच नापाक पाकडं आहे
ठेचून काढलं कितीही तरी
शेपूट त्याचं वाकडं आहे

गद्दार आहेत जे त्यांना
ठेचूनच काढलं पाहिजे
खड्यासारखं अलगद
वेचूनच काढलं पाहिजे

हुतात्म्यांच्या थेंबाथेंबाचा
देश फक्त बदला मागतो आहे
आता सार्‍या जगानं पाहिलं
कशाला मग पुरावा लागतो आहे
• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
  मो.८८०५७९१९०५

१८ फेब्रुवारी २०१९ दै. युवा छत्रपती वात्रटिका क्रं. ११९
Vatratika


रविवार, १७ फेब्रुवारी, २०१९

सर्जिकल वार

खरपूस • वात्रटिका

« सर्जिकल वार »
सांगून समजत नाही
सुनावला जरी बोल खडा
परत शिकवला पाहिजे
शत्रूला चांगलाच धडा

अनुभव आहे गाठीशी
अन् वेदना आहेत 'उरी'
घुसून मारायलाच हवे
अाता काही झाले तरी

भ्याड हल्ला करणार्‍या
शत्रूला ठार मारायलाच हवा
विसरू शकणार नाही असा
सर्जिकल वार करायलच हवा
• रघुनाथ सोनटक्के

(१६ फेब्रुवारी २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.११८ व 
मराठवाडा संचार मधे प्रकाशित)
तसेच १८ फेब्रुवारीच्या दै. बलशाली भारत मधे प्रकाशित 
Vatratika Vatratika Vatratika

शुक्रवार, १५ फेब्रुवारी, २०१९

कॅम्पेन आणि मिशन

खरपूस • वात्रटिका

« कॅम्पेन आणि मिशन »
गरिब, शेतकरी, बेरोजगार
आता हेच त्यांचं लक्ष आहे
मरायला टेकला उपेक्षित
अन् गिधाड हरेक पक्ष आहे

म्हणतील 'द्या आम्हाला मौका'
करतो आम्ही सेवा आहे
जनता राहिल उपाशीपोटी
त्यांना मिळेल तो 'मेवा' आहे

प्रत्येक पार्टीचं कॅम्पेन 
एकच त्यांचं मिशन आहे
ओलांडून जातील सर्वांना
अन् सत्ता अंतिम स्टेशन आहे
• रघुनाथ सोनटक्के

(१५ फेब्रुवारी २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.११७)
१६ फेब्रुवारी २०१९ च्या बलशाली भारत मधे प्रकाशित 
Vatratika Vatratika

गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१९

धावाधाव

खरपूस • वात्रटिका

« धावाधाव »
घडामोडींना वेग आला
मतदारसंघ ठरू लागले
कधी नव्हे चेहरे त्यांचे
गल्लोगल्ली फिरू लागले

जागा जिंकण्यासाठी
प्रत्येकाचा दावा आहे
मन वळवायला राजाचे 
त्यांचा आता धावा आहे

झोपलेला आता वेळेवर
कामे तातडीने करू लागला
विजय सुकर करण्यास
मतांची तुंबडी भरू लागला
• रघुनाथ सोनटक्के

(१४ फेब्रुवारी २०१९ च्या दै. बलशाली भारत व दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.११६)

Vatratika Vatratika

बुधवार, १३ फेब्रुवारी, २०१९

पक्षांतर

खरपुस • वात्रटिका

« पक्षांतर »

आज कुणी यात आहे
तर उद्या त्यात आहे
कुणाला वर्षही पुरेसं
कुणाची सारी हयात आहे

पद आणि सत्तेसाठी
पक्षबदलूंचा हा खेळ असतो
निवडणूकीच्या आधीच
यांना चांगला वेळ असतो

नाममात्र निमित्त काढून
पक्षात याचं फाटत असते
पुर्वीसारखंच याही पक्षात
लाभ सारे हा लाटत असते
• रघुनाथ सोनटक्के

५ फेब्रुवारी २०१९ च्या दै. प्रीतीसंगम, मराठवाडा संचार, बलशाली भारत, डहाणू-मित्र मधे प्रकाशित 
(१३ फेब्रुवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ११)
५ फेब्रुवारी २०१९ च्या दै. पथदर्शी  व ७ फेब्रुवारी २०१९ च्या दै. वाचकमंच मधे प्रकाशित
VatratikaVatratikaVatratika 
Vatratika Vatratika Vatratika

पुतळ्यांचा सवाल

खरपूस • वात्रटिका

« पुतळ्यांचा सवाल »
सरकारी खर्चाने बांधलेले
पुतळे उभे हसत आहेत
किंमत वसूल करायला
'माये'लाच पुसत आहेत

'हत्ती'वरून गुळ वाटला
आता खायचे फाके आहेत
कुणाला आले 'अच्छे' खासे
कुणाला दिन बाके आहेत

सत्तेचा दूरूपयोग करणे
प्रत्येकालाच जमले नाही
'बदला' घ्यायला बघाना
पुतळेही कुठे थांबले नाही!
• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
  मो. ८८०५७९१९०५
(१२ फेब्रुवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ११)
Vatratika




सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१९

बारामतीला धक्का

खरपूस • वात्रटिका

« बारामतीला धक्का »

बालेकिल्लात घड्याळाला
अाता धक्का मिळणार आहे
कट'शहा'च्या राजकारणात
कधी नव्हे कमळ फुलणार आहे

'सामना' होण्याआधीच
रणमैदानही जिंकले आहे
सर्व जागांसाठी ताणून
रणशिंग त्यांनी फुंकले आहे
• रघुनाथ सोनटक्के

(११ फेब्रुवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ११३)
Vatratika