गुरुवार, २१ फेब्रुवारी, २०१९

समविचारी

« समविचारी »

दोन्ही पक्षांमधे कोणतातरी
समान एक दूवा असतो
प्रत्येकाला सत्तेचा गड
काही केल्या हवा असतो

समविचारी असलो तरी
नेतृत्व वेगळं असते
तेवढं सोडून बोललं तर
बाकी सेम सगळं असते

• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
  मो. ८८०५७९१९०५
(दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.१२)

२३ फेब्रुवारी २०१९ च्या दै. मराठवाडा संचार आणि बलशाली भारत मधे प्रकाशित 
६ मार्च २०१९ च्या दै. पथदर्शी मधे प्रकाशित


मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१९

शिवजयंती

« शिवजयंती »


Calligraphy by Raghunath Sontakke

तिथी काढून महाराजांनी कधी
चढला नव्हता किल्ला
साजरी करायला जंयती
मग हवा कुणाचा सल्ला

ठरवलेली तारिख ठेवा
करू नका नुसते वाद
दाखवा करून 'पराक्रम'
घालू नका नुसती साद

'विचार' आणि 'स्वाभिमान'
प्रत्येकानेच जपायला पाहिजे
राजांचा विचार शेवटी
जनतेपर्यंत पोचायला पाहिजे

त्यांचं नाव घेणं सत्तेसाठी
असतात राज्यकारण्यांचे फंडे
राज्यांचं आणुन दाखवा 'स्वराज्य'
फडकवु नका नुसते झेंडे

   • रघुनाथ सोनटक्के
     मो. 8805791905

ईबुक: https://goo.gl/aY6hVB
ब्लॉग: https://vatratika.blogspot.in
रसिकचा फेब्रुवारी अंक: https://goo.gl/RuZBEU
१९ फेब्रुवारी २०१९ च्या दै. युवा छत्रपती ला प्रकाशित 
Vatratika

हमल्याचं कवित्व


« हमल्याचं कवित्व »

शहिद झाले जवान
आता कवित्व राहिलं आहे
अनेकांचं बेगडीपण
देशभक्तीत पाहिलं आहे

कुणी अजून शांतीच्याच 
वाटेवर अडून आहे
संवाद समजायला कुठे
समोरचा पडून आहे!

तवा गरम भावनांचा
कुणी पोळी शेकतो आहे
ठोस कृतीची गरज पण
इशारेच फक्त ऐकतो आहे
• रघुनाथ सोनटक्के

 फेब्रुवारी २०१९ दै. युवा छत्रपती वात्रटिका क्रं. १२०
२० फेब्रुवारी २०१९ च्या दै . 'बलशाली भारत'ला प्रकाशित 
Vatratika Vatratika

शहिदांचा बदला

« शहिदांचा बदला »

सैनिकांवरील हल्ल्यामागे
तेच नापाक पाकडं आहे
ठेचून काढलं कितीही तरी
शेपूट त्याचं वाकडं आहे

गद्दार आहेत जे त्यांना
ठेचूनच काढलं पाहिजे
खड्यासारखं अलगद
वेचूनच काढलं पाहिजे

हुतात्म्यांच्या थेंबाथेंबाचा
देश फक्त बदला मागतो आहे
आता सार्‍या जगानं पाहिलं
कशाला मग पुरावा लागतो आहे
• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
  मो.८८०५७९१९०५

१८ फेब्रुवारी २०१९ दै. युवा छत्रपती वात्रटिका क्रं. ११९
Vatratika


रविवार, १७ फेब्रुवारी, २०१९

सर्जिकल वार

खरपूस • वात्रटिका

« सर्जिकल वार »
सांगून समजत नाही
सुनावला जरी बोल खडा
परत शिकवला पाहिजे
शत्रूला चांगलाच धडा

अनुभव आहे गाठीशी
अन् वेदना आहेत 'उरी'
घुसून मारायलाच हवे
अाता काही झाले तरी

भ्याड हल्ला करणार्‍या
शत्रूला ठार मारायलाच हवा
विसरू शकणार नाही असा
सर्जिकल वार करायलच हवा
• रघुनाथ सोनटक्के

(१६ फेब्रुवारी २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.११८ व 
मराठवाडा संचार मधे प्रकाशित)
तसेच १८ फेब्रुवारीच्या दै. बलशाली भारत मधे प्रकाशित 
Vatratika Vatratika Vatratika

शुक्रवार, १५ फेब्रुवारी, २०१९

कॅम्पेन आणि मिशन

खरपूस • वात्रटिका

« कॅम्पेन आणि मिशन »
गरिब, शेतकरी, बेरोजगार
आता हेच त्यांचं लक्ष आहे
मरायला टेकला उपेक्षित
अन् गिधाड हरेक पक्ष आहे

म्हणतील 'द्या आम्हाला मौका'
करतो आम्ही सेवा आहे
जनता राहिल उपाशीपोटी
त्यांना मिळेल तो 'मेवा' आहे

प्रत्येक पार्टीचं कॅम्पेन 
एकच त्यांचं मिशन आहे
ओलांडून जातील सर्वांना
अन् सत्ता अंतिम स्टेशन आहे
• रघुनाथ सोनटक्के

(१५ फेब्रुवारी २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.११७)
१६ फेब्रुवारी २०१९ च्या बलशाली भारत मधे प्रकाशित 
Vatratika Vatratika

गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१९

धावाधाव

खरपूस • वात्रटिका

« धावाधाव »
घडामोडींना वेग आला
मतदारसंघ ठरू लागले
कधी नव्हे चेहरे त्यांचे
गल्लोगल्ली फिरू लागले

जागा जिंकण्यासाठी
प्रत्येकाचा दावा आहे
मन वळवायला राजाचे 
त्यांचा आता धावा आहे

झोपलेला आता वेळेवर
कामे तातडीने करू लागला
विजय सुकर करण्यास
मतांची तुंबडी भरू लागला
• रघुनाथ सोनटक्के

(१४ फेब्रुवारी २०१९ च्या दै. बलशाली भारत व दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.११६)

Vatratika Vatratika

बुधवार, १३ फेब्रुवारी, २०१९

पक्षांतर

खरपुस • वात्रटिका

« पक्षांतर »

आज कुणी यात आहे
तर उद्या त्यात आहे
कुणाला वर्षही पुरेसं
कुणाची सारी हयात आहे

पद आणि सत्तेसाठी
पक्षबदलूंचा हा खेळ असतो
निवडणूकीच्या आधीच
यांना चांगला वेळ असतो

नाममात्र निमित्त काढून
पक्षात याचं फाटत असते
पुर्वीसारखंच याही पक्षात
लाभ सारे हा लाटत असते
• रघुनाथ सोनटक्के

५ फेब्रुवारी २०१९ च्या दै. प्रीतीसंगम, मराठवाडा संचार, बलशाली भारत, डहाणू-मित्र मधे प्रकाशित 
(१३ फेब्रुवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ११)
५ फेब्रुवारी २०१९ च्या दै. पथदर्शी  व ७ फेब्रुवारी २०१९ च्या दै. वाचकमंच मधे प्रकाशित
VatratikaVatratikaVatratika 
Vatratika Vatratika Vatratika

पुतळ्यांचा सवाल

खरपूस • वात्रटिका

« पुतळ्यांचा सवाल »
सरकारी खर्चाने बांधलेले
पुतळे उभे हसत आहेत
किंमत वसूल करायला
'माये'लाच पुसत आहेत

'हत्ती'वरून गुळ वाटला
आता खायचे फाके आहेत
कुणाला आले 'अच्छे' खासे
कुणाला दिन बाके आहेत

सत्तेचा दूरूपयोग करणे
प्रत्येकालाच जमले नाही
'बदला' घ्यायला बघाना
पुतळेही कुठे थांबले नाही!
• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
  मो. ८८०५७९१९०५
(१२ फेब्रुवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ११)
Vatratika




सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१९

बारामतीला धक्का

खरपूस • वात्रटिका

« बारामतीला धक्का »

बालेकिल्लात घड्याळाला
अाता धक्का मिळणार आहे
कट'शहा'च्या राजकारणात
कधी नव्हे कमळ फुलणार आहे

'सामना' होण्याआधीच
रणमैदानही जिंकले आहे
सर्व जागांसाठी ताणून
रणशिंग त्यांनी फुंकले आहे
• रघुनाथ सोनटक्के

(११ फेब्रुवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ११३)
Vatratika

शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१९

आकडेवारी

खरपूस • व‍ात्रटिका

« आकडेवारी »
सरकारची आकडेवारी
वेगळेच बोलत असते
विपरित परिस्थितीतही कांदे 
नाकाने सोलत असते

ते आपलं घोडं दामटतात
दाटून बोलण्याचा रेटा असतो
वेदना आणि आक्रोश
उगीच काय खोटा असतो?

त्य‍ांनी बोललं म्हणजे
सारं काही सत्य नसते
अंदाज बांधणार्‍या सगळ्याच 
आकडीवारीत तथ्य नसते
• रघुनाथ सोनटक्के

(९ फेब्रुवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ११)


शुक्रवार, ८ फेब्रुवारी, २०१९

स्मारकाची उंची

खरपूस • वात्रटिका

« स्मारकाची उंची »

अधूनमधून स्मारकांचा
आणि उंचीचा वाद आहे
भुमीपूजनानंतर वेळोवेळी
भावनेला हळूच साद आहे

थोड्या थोड्या दिवसांनी
स्मारकाची उंची घटत असते
राजकारणी किती खुजी आहेत
मनाला हे पटत असते

पुतळे, स्मारके याकडेच 
राजकारण आजकाल वळले आहे 
विकासकामांना डच्चू जातोय
अजूनही कुठे कळले आहे!
• रघुनाथ सोनटक्के

(८ फेब्रुवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १११, मराठवाडा संचार मधे प्रकाशित )
Vatratika Vatratika


गुरुवार, ७ फेब्रुवारी, २०१९

मॅच

खरपूस • वात्रटिका

« मॅच »
यांची फिफ्टी-फिफ्टी आहे
त्यांची ट्वेंटी-ट्वेंटी आहे
यांचा सुटला बरं गुंता
त्यांचा सुटण्या अंती आहे

समिकरणं जुळून आल्याने
हमीची मतंही टिकली आहे
हिशोब लावून प्रत्येकाने
आधीच जागाही विकली आहे

• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
  मो.८८०५७९१९०५
(७ फेब्रुवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १०, तसेच मराठवाडा संचार मधे प्रकाशित )
Vatratika Vatratika




बुधवार, ६ फेब्रुवारी, २०१९

मतांची पेरणी

मतांची पेरणी

एवढे वर्षे नाक दाबलं 
आता तोंड उघडलं आहे
निवडणुकीच्या तोंडावर 
काय भारी घडलं आहे!

सवलतींची खैरात आता
मतांसाठी पेरणी आहे 
महाप्रसाद अजून बाकी  
हि तर नुसतं 'शिरणी' आहे
• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
  मो. ८८०५७९१९०५
(६ फेब्रुवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १०९, तसेच मराठवाडा संचार मधे प्रकाशित)
१२ फेब्रुवारी २०१९ च्या दै. बलशाली भारत मधे प्रकाशि
Vatratika VatratikaVatratika

मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१९

अण्णांचं उपोषण

« अण्णांचं उपोषण »
सगळ्यांच्याच अण्णांना आता 
नियती कळाल्या आहेत 
काहींच्या तर आंदोलनाला 
शुभेच्छाही मिळाल्या आहे 

नाही म्हटले जरी तुम्ही 
मागण्या पूर्ण झाल्या आहेत 
सुटासमोर गांधी टोप्या 
खूपच जीर्ण झाल्या आहे 

• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
 मो. ८८०५७९१९०५
(४ फेब्रुवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १०८)
Vatratika


सोमवार, ४ फेब्रुवारी, २०१९

पुरस्कार

खरपूस • वात्रटिका

    « पुरस्कार »
पुरस्कार आता खरं तर
'पुरस्कारा'सारखा राहिला नाही
कुणी म्हणतं योग्याला तो
मिळाल्याचा आम्ही पाहिला नाही

महान नेत्या-महात्म्यांचं कार्य
जगापासून लपून राहिलं नाही
अमूल्य ते कर्तृत्व अजून 
कुणी मापून पाहिलं नाही

कुणी त्यामुळेच लोकांच्या मनात
भारत'रत्न' ठरलं आहे
आजकालच्या पूरस्कारात फक्त
राजकारणच उरलं आहे
• रघुनाथ सोनटक्के

(४ फेब्रुवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १०)
Vatratika

रविवार, ३ फेब्रुवारी, २०१९

अर्थसंकल्प

«वात्रटिका»

अर्थसंकल्प

चांगला विकासदर गाठण्याचा 
काय 'संकल्प' सार्थ नाही ?
कसाही खर्च केला तरी
विरोधकांच्या मते 'अर्थ' नाहीं

शेतकर्‍याचे वाढवुन उत्पन्न

रोगांच्या निर्मुलनाचा 'संकल्प' आहे
पक्षांनांही कात्रीत पकडण्याचा
'डिजीटल' प्रयत्न अल्प आहे

शेतकरी, गरिब, व्यापारी छोटे

सगळ्यांना दिला 'आधार' आहे
विरोधकांना काय वाटायचे वाटू दे
नियोजन, नितीचा हा सार आहे

• रघुनाथ सोनटक्के, ८८०५७९१९०५
(२ फेब्रुवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १०६)
Vatratika



शुक्रवार, १ फेब्रुवारी, २०१९

बापूंची हत्या

खरपूस • वात्रटिका

    « बापूंची हत्या »
बापू तुमची परत एकदा
हत्या झाली आहे
मनात वसलेला मरेना म्हणून
मिथ्या झाली आहे

विकृत मानसिकतेचा
निषेध करावा तेवढा कमी आहे
परत येऊ नका बापू
यांची अजून कुठे हमी आहे!

सत्य आणि अहिंसेचा
मार्ग यांनी पुसला आहे
विकृतपणाच्या कळसाने
मेंदू यांचा नासला आहे
• रघुनाथ सोनटक्के

(१ फेब्रुवारी २०१९ दै. मराठवाडा संचार मधे प्रकाशित, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १०५)
Vatratika Vatratika