सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१८

मंदीर प्रवेश

« मंदीर प्रवेश »

लिंगभेद करून मंदीरात
प्रवेश नाकारल्या जातो
स्त्री-पुरूष समानतेचा इथे
कोणता न्याय वापरल्या जातो!

अजूनही कोण्या काळात
आपण जगतो आहोत
स्त्रीला मंदीराबाहेर ठेवून
खरंच बरे वागतो आहोत?

कायदे करून पुरे नाहीत
मानसिकता बलवायला हवी
अधिकार डावलणारी खुजी
दलालीच मिटवायला हवी

•  रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव दाभाडे, पुणे
   मो. 8805791905

२२ ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २२)
४ नोव्हेंबर २०१८ च्या विदर्भ मतदार

Vatratika

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks to comment on my blog. :)