सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८

मी टू

खरपूस • वात्रटिका

  « मी टू »

सिनेक्षेत्र, राजकारणाला
'मी टू' ची घरघर लागली आहे
'बाबूजी'सारखी मंडळी
कळते कशी ही वागली आहे!

मोठे नेते, अभिनेते 
यांची बिंगं फुटायला लागली
काही वर्षांनंतर, झोपलेल्यांना
आता शिंगं फुटायला लागली

झाला अत्याचार की लगेच
आवाज उठावायला हवा होता
चेहर्‍यामागील राक्षस फाडण्याचा
तेव्हाच करायचा दावा होता



• रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव दाभाडे, पुणे

  मो. 8805791905


१६ ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १७)







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks to comment on my blog. :)