खरपूस • वात्रटिका
« सोडचिठ्ठी »
तत्वाधारित राजकारण कुठाय
संधीसाठी बाऊ केल्या जातो
मतेमतांतराचा सोडचिठ्ठीसाठी
राईचा मोठा राऊ केल्या जातो
गड शाबुत राखायला मग
पक्षाची नाळ तोडली जाते
तडजोडी करून नव्याची
वेगळीच वाट जोडली जाते
विविधढंगी जनता आणि नेते
असं आमचं 'राष्ट्र' आहे
वादा'वादी'त विकासाचा र्हास
देशाला लागलं शुक्लकाष्ठ आहे
• रघुनाथ सोनटक्के
संधीसाठी बाऊ केल्या जातो
मतेमतांतराचा सोडचिठ्ठीसाठी
राईचा मोठा राऊ केल्या जातो
गड शाबुत राखायला मग
पक्षाची नाळ तोडली जाते
तडजोडी करून नव्याची
वेगळीच वाट जोडली जाते
विविधढंगी जनता आणि नेते
असं आमचं 'राष्ट्र' आहे
वादा'वादी'त विकासाचा र्हास
देशाला लागलं शुक्लकाष्ठ आहे
• रघुनाथ सोनटक्के
तळेगाव दाभाडे, पुणे
मो. 8805791905
१ ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ४)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks to comment on my blog. :)