मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१८

ऑनलाईन दारू

खरपूस • वात्रटिका

  « ऑनलाईन दारू »

आज ऑनलाईन झाली 
उद्या सबसिडी देतील 
सोबतीला तळीराम
बिडी फ्रीमधे पितील

घरपोचने अपघात कमी 
अजब त्यांचे तर्क आहेत 
बांधीलकी सोडून वाऱ्यावर 
कशात हे गर्क आहेत

तळीरामही सरकारला
आपले वाटू लागले
दोघांनाही चढली की काय
असेच वाटू लागले


• रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव दाभाडे, पुणे
  मो. 8805791905


१७ ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १८)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks to comment on my blog. :)