शुक्रवार, १२ ऑक्टोबर, २०१८

महागाईचा वारू

खरपूस • वात्रटिका

    « महागाईचा वारू »

    रूपया रोज गडगडतोय
विकासही झाला मंद आहे
महागाईचा वारू उधळून
सरकार स्व:स्तुतीच धुंद आहे

महागाईच्या भस्मासुराने 
पोटात अामच्या गोळा येतो
गाडीत फिरणार्‍यांना कुठे
याचा अंदाज थोडा येतो!

सरकार बसलं मुग गिळून
विरोधकांचा बवाल आहे
प्रश्न‍ांना कधी मिळेल वाट
हाच आमचा सवाल आहे



• रघुनाथ सोनटक्के
तळेगाव दाभाडे, पुणे
मो. 8805791905

१३ ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १५) व २२ ऑक्टोबर २०१८ च्या दै. पथदर्शी मधे प्रकाशित



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks to comment on my blog. :)