खरपूस • वात्रटिका
« गरिबांना आरक्षण »
आठ लाखांचे उत्पन्नवालाही
आता 'गरीब' असणार आहे
रोजगाराची हमी असो वा नसो
आरक्षणाच्या कक्षेत दिसणार आहे
उशिराच्या मंजुरीला थोडे
राजकीय रंग आले आहे
मनमोहक निर्णय घेण्यात
सरकार दंग झाले आहे
हे सर्व काळाच्या कसोटीवर
खरंच आता टिकायला हवे
गरीब-श्रीमंतातील भेद
लवकरच मिटायला हवे
राजकीय रंग आले आहे
मनमोहक निर्णय घेण्यात
सरकार दंग झाले आहे
हे सर्व काळाच्या कसोटीवर
खरंच आता टिकायला हवे
गरीब-श्रीमंतातील भेद
लवकरच मिटायला हवे
• रघुनाथ सोनटक्के
(१० जानेवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ८९)
(१० जानेवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ८९)





