श्रेयवादाची आता परत लढाई सुरू झाली आहे हुतात्म्यांना विसरून बढाई सुरू झाली आहे जल्लोष करायला हवा कसोटीवर टिकलं पाहिजे लोकांच्या इच्छेतूनच बदल होतो सगळ्यांनीच शिकलं पाहिजे
• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
मो. 8805791905
१ डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ५५)
प्रशासनातील काहीजण भ्रष्टाचाऱ्यांची तळी धरतात स्वार्थ आणि लोभापायी सामान्य मग बळी ठरतात कामचुकारपणाचा रोग, लाचखोरीची कीड लागली आहे खेकड्यांसारखी एकमेकांत खाण्याचीही चढाओढ लागली आहे जाब विचारून जनतेने सरकारनेही झापले पाहिजे 'बेशरमी'सारखे वाढण्याआधीच मुळासकट कापले पाहिजे
• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
मो. 8805791905
३० नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ५४) १ डिसेंबर २०१८ दै. पथदर्शी'ला प्रकाशित
हा बघा तो बघा सद्या रामनाम जपतो आहे जगाचा पोशिंदा मात्र दुष्काळाने खपतो आहे महागाईने केला जुलूम कुणी रोजगार मागतो आहे राजकारणी मात्र त्याला चेतवायला बघतो आहे कुणातच, कशाचा आता कुठे राम राहिला नाही देवाच्या नादाने भूकेल्यात कुणी राम पाहिला नाही
खेळाने दमदार आपल्या मेरीने नाव कोरले आहे एक नाही दोन नाही सहाव्यांदा अजिंक्य ठरले आहे कष्टाने मेरी तू तिरंगा जगात फडकवला आहे गर्व असावा असा पराक्रम सातासमुद्रापार घडवला आहे स्वत:साठी नाही तर देशासाठी खेळण्याचा धडा घेतला पाहिजे खेळातही राजकारण करणार्यांनी विचार तिचा थोडा घेतला पाहिजे
धर्म आणि राजकारणाचं नातं खुप आहे जुनं कोणी विभागलं धर्मानं तर जातीला पोसलं आहे कोणं विकास नाही देशाचा जनतेला भरकटवल्या 'जात' आहे कुणाची पैशाच्या जोरावर तर कुणाची समीकरणानं मात आहे खरी लोकशाही आणायला जात आता गेली पाहिजे चेहरा असु द्या कुणाचाही विकासालाच मतं दिली पाहिजे
चर्चा ना पटलावर आला कुणी राजदंड पळवला आहे राजकारणापायी मुद्याला कुठच्या कुठे वळवला आहे आरक्षणावरून वाटतो आता जातीजातीत पंगा आहे सरकार आणि विरोधीपक्षाचा सभागृहात नुसता दंगा आहे
उद्योगपतींना खुशाल आम्ही कर्ज करतो माफ फक्त शेतकर्यानंच काय केलं एवढं मोठं पाप घ्यावा लागतो शेतकर्याला अडकवुन गळ्यात फास आत्महत्यांची आकडेवारी सांगताना लागत नाही ढास 'हमी' नाही त्याला कशाची फक्त आश्वासनापुरता 'भाव' साथ नाही त्याला निसर्गाची सरकाराही ढकलतय धिमे नाव
https://vatratika.blogspot.in (दि २ जून २०१८ च्या दै. 'युवा छत्रपती' लातूर या दैनिकात प्रकाशित ) १९ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ४४)
कालपर्यंत भांडले अवसान आणुन आज बसलेत खाऊन कथ्था उद्या वाटाघाटी करतील बंदरूममधे अन् जमवतील जांगळगुत्ता जनशक्ति दाखवुन देईल कोण लायक आहे अन् होता त्याच्याच हाती चाबी असेल अन् त्याचीच चालेल सत्ता
• रघुनाथ सोनटक्के
8805791905 १७ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ४३)
पाटी पुसून नवीन अक्षर परत-परत गिरवलं जाते भावनांचा जातं अधूनमधून असंच हे फिरवलं जाते मतांसाठींचे उपद्व्याप की नुसतंच हे खुळ आहे रणांगण पाहून दौडायला उडवणे चालले धूळ आहे
- रघुनाथ सोनटक्के
१५ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ४१)