गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८

रामनाम

« रामनाम »

हा बघा तो बघा सद्या
रामनाम जपतो आहे
जगाचा पोशिंदा मात्र
दुष्काळाने खपतो आहे

महागाईने केला जुलूम
कुणी रोजगार मागतो आहे
राजकारणी मात्र त्याला
चेतवायला बघतो आहे

कुणातच, कशाचा आता
कुठे राम राहिला नाही
देवाच्या नादाने भूकेल्यात
कुणी राम पाहिला नाही

• रघुनाथ सोनटक्के
  मो. ८८०५७९१९०५
शब्दरसिक दिवाळी अंक: http://bit.ly/ShabdRasik-2018
२९ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ५३)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks to comment on my blog. :)