सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१८

दुष्काळाची घोषणाबाजी

« दुष्काळाची घोषणाबाजी »

दुष्काळ जाहीर करून
काय साध्य केलं जातं!
मलमपट्टी धोरणांमुळेच
आत्महत्येस बाध्य केलं जातं

आश्वासन देऊन कुठे
सातबारा त्याचा कोरा राहतो
उत्पन्न दुप्पट करण्याचा
सरकारी फक्त नारा राहतो

त्याचे वाली असल्याचा
प्रत्येकाचा तोरा असतो
घोषणाबाजीचाही हेतू
नेहमीच कुठे खरा असतो

•  रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव दाभाडे, पुणे
   मो. 8805791905

३ ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २३), दै. पथदर्शी व दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित



मंदीर प्रवेश

« मंदीर प्रवेश »

लिंगभेद करून मंदीरात
प्रवेश नाकारल्या जातो
स्त्री-पुरूष समानतेचा इथे
कोणता न्याय वापरल्या जातो!

अजूनही कोण्या काळात
आपण जगतो आहोत
स्त्रीला मंदीराबाहेर ठेवून
खरंच बरे वागतो आहोत?

कायदे करून पुरे नाहीत
मानसिकता बलवायला हवी
अधिकार डावलणारी खुजी
दलालीच मिटवायला हवी

•  रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव दाभाडे, पुणे
   मो. 8805791905

 ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २)
४ नोव्हेंबर २०१८ च्या विदर्भ मतदार

Vatratika

मंदीर पॉलिटिक्स

« मंदीर पॉलिटिक्स »

संकटात देव आठवतो

'मंदीर'ही दिसते पुढे
आश्वासने पुर्ण करायला
कशाला मग आढेवेढे!
त्याच्या नावाने मिळवावी वाटते 
प्रत्येक पक्षाला सत्त्ता 
'राम'ही वैतागला पाहून
गिरवलेला एकच कित्ता

•  रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव दाभाडे, पुणे
   मो. 8805791905

 ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २)

Vatratika

शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१८

लेबल

« लेबल »

जुन्या बाटलीत परत
नवी दारू भरली जाते
वादे, जाहिरनाम्यांवरची
धूळ परत सारली जाते

घोषणा, नवी नावे
मूळ निती स्टेबल असते
रणनीतीनुसार चाली ठरतात
आणि वेगळंच लेबल असते


•  रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव दाभाडे, पुणे
   मो. 8805791905

१९ ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २०)


Vatratika

गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१८

कार्यकर्ता

ख र पु स • वा त्र टि का

    « कार्यकर्ता »

चाहूल लागली की इलेक्शनची
कार्यकर्त्यावर भिस्त असते
कधी नव्हे तितकी त्यांच्यामधे
याच काळात शिस्त असते

कामाला लागा म्हणुन
लगाम खेचल्या जातो
कार्यकर्त्याला बरोबर वेळीच
खडा केल्या जातो

मत पडेपर्यंत गड्यांना
कमालीचा भाव असतो
पाया पडायचीच फक्त सवड
देव-भक्ताचा आव असतो


     • रघुनाथ सोनटक्के

        तळेगाव दाभाडे, पुणे

        मो. 8805791905

वात्रटिकासंग्रह: https://goo.gl/7CcLUw
दिवाळी अंक २०१७: https://goo.gl/RxRw8g

१८ ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १९)

Vatratika

मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१८

ऑनलाईन दारू

खरपूस • वात्रटिका

  « ऑनलाईन दारू »

आज ऑनलाईन झाली 
उद्या सबसिडी देतील 
सोबतीला तळीराम
बिडी फ्रीमधे पितील

घरपोचने अपघात कमी 
अजब त्यांचे तर्क आहेत 
बांधीलकी सोडून वाऱ्यावर 
कशात हे गर्क आहेत

तळीरामही सरकारला
आपले वाटू लागले
दोघांनाही चढली की काय
असेच वाटू लागले


• रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव दाभाडे, पुणे
  मो. 8805791905


७ ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १८)


सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८

मी टू

खरपूस • वात्रटिका

  « मी टू »

सिनेक्षेत्र, राजकारणाला
'मी टू' ची घरघर लागली आहे
'बाबूजी'सारखी मंडळी
कळते कशी ही वागली आहे!

मोठे नेते, अभिनेते 
यांची बिंगं फुटायला लागली
काही वर्षांनंतर, झोपलेल्यांना
आता शिंगं फुटायला लागली

झाला अत्याचार की लगेच
आवाज उठावायला हवा होता
चेहर्‍यामागील राक्षस फाडण्याचा
तेव्हाच करायचा दावा होता



रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव दाभाडे, पुणे

  मो. 8805791905


६ ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १७)







रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८

लाॅबिंग

« लाॅबिंग »

उमेदवारीसाठी प्रत्येकाकडून
आतापासून लाॅबिंग केल जातं
पंचवार्षिक सोय करण्यासाठी
कसून मग सेटिंग केलं जातं

ताकद बघून पहेलवानाची
पक्षाकडून बाहूबल मापल्या जातं
सोईच्या राजकारणात
विद्यमानांचही तिकीट कापल्या जातं


•  रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव दाभाडे, पुणे
   मो. 8805791905

 ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १६)

शुक्रवार, १२ ऑक्टोबर, २०१८

महागाईचा वारू

खरपूस • वात्रटिका

    « महागाईचा वारू »

    रूपया रोज गडगडतोय
विकासही झाला मंद आहे
महागाईचा वारू उधळून
सरकार स्व:स्तुतीच धुंद आहे

महागाईच्या भस्मासुराने 
पोटात अामच्या गोळा येतो
गाडीत फिरणार्‍यांना कुठे
याचा अंदाज थोडा येतो!

सरकार बसलं मुग गिळून
विरोधकांचा बवाल आहे
प्रश्न‍ांना कधी मिळेल वाट
हाच आमचा सवाल आहे



रघुनाथ सोनटक्के
तळेगाव दाभाडे, पुणे
मो. 8805791905

३ ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १५) व  ऑक्टोबर २०१८ च्या दै. पथदर्शी मधे प्रकाशित



गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१८

नव्याचे नऊ दिवस

खरपूस • वात्रटिका

   « नव्याचे नऊ दिवस »

नव्याचे नऊ दिवस बघून घ्या
स्त्री-शक्तीचा जागर असतो
तेवढ्यापुरतं देवीला मानुन
बाकीवेळा शैतानांचा वावर असतो

समानता, आदर करण्याचा
विचार मनात पेरला पाहिजे
लिंगसमानतेच्या विचाराने
अहंकाराला घेरला पाहिजे


रघुनाथ सोनटक्के
तळेगाव दाभाडे, पुणे
मो. 8805791905

 ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १४)


मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१८

दुष्काळाशी सामना

खरपूस • वात्रटिका

« दुष्काळाशी सामना »

राज्याच्या काही भागात 
दुष्काळाचे ढग दाटले आहेत
सुकलेले रानमाळ बघून
शेतकर्‍याचे ऊर फाटले आहेत

खुप कमी ठिकाणी पावसाने
सरासरी गाठली आहे
पाणीटंचाई आतापासूनच सुरू
काही धरणेही आटली आहे

शेतकर्‍याचा दुष्काळाशी परत
थेट सामना रंगला आहे
स्वप्न आणि जमिनीला तडे
आकाशी जीव टांगला आहे


 रघुनाथ सोनटक्के

     तळेगाव दाभाडे, पुणे

     मो. 8805791905

१० ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १२)

शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१८

खिसा खाली

खरपूस • वात्रटिका

« खिसा खाली »

पेट्रोल कधी महाग होते
कधी थोडेच स्वस्त होते
कंपन्या, सरकार मजेत
जनता मात्र त्रस्त होते

आज रणकंदन करणारा
उद्या जनतेचा वाली होतो
कुणाच्याही काळात बघा
खिसा जनतेचाच खाली होतो

रघुनाथ सोनटक्के

  तळेगाव दाभाडे, पुणे

मो. 8805791905

 ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. व  ऑक्टोबर २०१८ दै. पथदर्शी मधे प्रकाशित

गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१८

घराणेशाही

खरपूस • वात्रटिका

« घराणेशाही »

राजकारणात नेत्यांची पिढी
हळूहळू घुसवली जाते
घराणेशाही पाळून यांची
लोकशाही नासवली जाते

लायक असो वा नसो
आप्तप्रेम पाळले जाते
नेतृत्वाची उणीव म्हणून
उट्टे जनतेवरच काढले जाते

सार्‍याच नेत्यांनी देशात
पिल्लांना आपल्या पोसलं आहे
मागे पळणार्‍यांच्या डोक्यात
व्यक्तिपुजेचं खुळ घुसलं आहे

• रघुनाथ सोनटक्के
तळेगाव दाभाडे, पुणे
मो. 8805791905


                    Raghunath Sontakke - Vatratika 
 ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )   व ९ ऑक्टोबर २०१८ दै. पथदर्शी प्रकाशित



बुधवार, ३ ऑक्टोबर, २०१८

हातमिळवणी

खरपूस • वात्रटिका

« हातमिळवणी »

स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही कुणी
राहिला अजून 'वंचित' आहे
विकासाची आता कुठे त्याला
आशा लागली किंचित आहे

आज यांची हातमिळवणी
उद्या त्यांची युती होईल
सत्तेसाठी भांडणार्‍याची
उद्या गोड प्रिती होईल

जनतेला दाखवायला भेद
आतून मात्र सख्य असते
लढाईसाठी शब्दांचे बाण
तहात मात्र ऐक्य असते

• रघुनाथ सोनटक्के
तळेगाव दाभाडे, पुणे
मो. 8805791905

४ ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )




अश्रुधूराची बरसात

ख र पु स • वा त्र टि का
« अश्रुधूराची बरसात »

लाठीमार, अश्रुधूराची
शेतकर्‍यांवर बरसात आहे
गांधीजींच्या देशात सरकार 
अन्नदात्यावरच बरसत आहे

दिलेल्या त्या आश्वासनांची 
दिल्ली अजून दूर आहे
पिकवणार्‍याला ना हमी
डोळ्यात त्याच्या अश्रुधूर आहे

ते असो कि हे असोत
सारी लुटारूंची टोळी आहे
सीमेवर सैनिक शहिद
इकडे शेतकर्‍याला गोळी आहे

रघुनाथ सोनटक्के
तळेगाव दाभाडे, पुणे
मो. 8805791905

 ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )


सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८

स्कँडल

खरपुस • वात्रटिका

   

   « स्कँडल »

चंदेरीविश्वात 'नाना'विध कला
उघड व्हायला लागल्या
'तनु'वरील घटना उजेडात
ताबडतोब यायला लागल्या!

दहा वर्षापूर्वींची कशी 
आत्ता 'स्कँडल' होऊ लागली!
दबलेली प्रकरणं ही मोठी
आता हॅंन्डल होऊ लागली

नट-नट्यांची लफडी अशी
चवीने वाचल्या जातात
पिडीताही मग यांच्यामुळे
खरंच पिचल्या जातात

रघुनाथ सोनटक्के

तळेगाव दाभाडे, पुणे
  मो. 8805791905

 ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )




सोडचिठ्ठी

खरपूस • वात्रटिका
  « सोडचिठ्ठी »

तत्वाधारित राजकारण कुठाय
संधीसाठी बाऊ केल्या जातो
मतेमतांतराचा सोडचिठ्ठीसाठी
राईचा मोठा राऊ केल्या जातो

गड शाबुत राखायला मग
पक्षाची नाळ तोडली जाते
तडजोडी करून नव्याची
वेगळीच वाट जोडली जाते
   
विविधढंगी जनता आणि नेते
असं आमचं 'राष्ट्र' आहे
वादा'वादी'त विकासाचा र्‍हास
देशाला लागलं शुक्लकाष्ठ आहे
रघुनाथ सोनटक्के
   तळेगाव दाभाडे, पुणे

  मो. 8805791905


१ ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )