« दुष्काळाची घोषणाबाजी »
दुष्काळ जाहीर करून
काय साध्य केलं जातं!
मलमपट्टी धोरणांमुळेच
आत्महत्येस बाध्य केलं जातं
आश्वासन देऊन कुठे
सातबारा त्याचा कोरा राहतो
उत्पन्न दुप्पट करण्याचा
सरकारी फक्त नारा राहतो
त्याचे वाली असल्याचा
प्रत्येकाचा तोरा असतो
घोषणाबाजीचाही हेतू
नेहमीच कुठे खरा असतो
• रघुनाथ सोनटक्के
तळेगाव दाभाडे, पुणे
मो. 8805791905२३ ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २३), दै. पथदर्शी व दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित



















