शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१९

आकडेवारी

खरपूस • व‍ात्रटिका

« आकडेवारी »
सरकारची आकडेवारी
वेगळेच बोलत असते
विपरित परिस्थितीतही कांदे 
नाकाने सोलत असते

ते आपलं घोडं दामटतात
दाटून बोलण्याचा रेटा असतो
वेदना आणि आक्रोश
उगीच काय खोटा असतो?

त्य‍ांनी बोललं म्हणजे
सारं काही सत्य नसते
अंदाज बांधणार्‍या सगळ्याच 
आकडीवारीत तथ्य नसते
• रघुनाथ सोनटक्के

(९ फेब्रुवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ११)


शुक्रवार, ८ फेब्रुवारी, २०१९

स्मारकाची उंची

खरपूस • वात्रटिका

« स्मारकाची उंची »

अधूनमधून स्मारकांचा
आणि उंचीचा वाद आहे
भुमीपूजनानंतर वेळोवेळी
भावनेला हळूच साद आहे

थोड्या थोड्या दिवसांनी
स्मारकाची उंची घटत असते
राजकारणी किती खुजी आहेत
मनाला हे पटत असते

पुतळे, स्मारके याकडेच 
राजकारण आजकाल वळले आहे 
विकासकामांना डच्चू जातोय
अजूनही कुठे कळले आहे!
• रघुनाथ सोनटक्के

(८ फेब्रुवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १११, मराठवाडा संचार मधे प्रकाशित )
Vatratika Vatratika


गुरुवार, ७ फेब्रुवारी, २०१९

मॅच

खरपूस • वात्रटिका

« मॅच »
यांची फिफ्टी-फिफ्टी आहे
त्यांची ट्वेंटी-ट्वेंटी आहे
यांचा सुटला बरं गुंता
त्यांचा सुटण्या अंती आहे

समिकरणं जुळून आल्याने
हमीची मतंही टिकली आहे
हिशोब लावून प्रत्येकाने
आधीच जागाही विकली आहे

• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
  मो.८८०५७९१९०५
(७ फेब्रुवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १०, तसेच मराठवाडा संचार मधे प्रकाशित )
Vatratika Vatratika




बुधवार, ६ फेब्रुवारी, २०१९

मतांची पेरणी

मतांची पेरणी

एवढे वर्षे नाक दाबलं 
आता तोंड उघडलं आहे
निवडणुकीच्या तोंडावर 
काय भारी घडलं आहे!

सवलतींची खैरात आता
मतांसाठी पेरणी आहे 
महाप्रसाद अजून बाकी  
हि तर नुसतं 'शिरणी' आहे
• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
  मो. ८८०५७९१९०५
(६ फेब्रुवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १०९, तसेच मराठवाडा संचार मधे प्रकाशित)
१२ फेब्रुवारी २०१९ च्या दै. बलशाली भारत मधे प्रकाशि
Vatratika VatratikaVatratika

मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१९

अण्णांचं उपोषण

« अण्णांचं उपोषण »
सगळ्यांच्याच अण्णांना आता 
नियती कळाल्या आहेत 
काहींच्या तर आंदोलनाला 
शुभेच्छाही मिळाल्या आहे 

नाही म्हटले जरी तुम्ही 
मागण्या पूर्ण झाल्या आहेत 
सुटासमोर गांधी टोप्या 
खूपच जीर्ण झाल्या आहे 

• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
 मो. ८८०५७९१९०५
(४ फेब्रुवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १०८)
Vatratika


सोमवार, ४ फेब्रुवारी, २०१९

पुरस्कार

खरपूस • वात्रटिका

    « पुरस्कार »
पुरस्कार आता खरं तर
'पुरस्कारा'सारखा राहिला नाही
कुणी म्हणतं योग्याला तो
मिळाल्याचा आम्ही पाहिला नाही

महान नेत्या-महात्म्यांचं कार्य
जगापासून लपून राहिलं नाही
अमूल्य ते कर्तृत्व अजून 
कुणी मापून पाहिलं नाही

कुणी त्यामुळेच लोकांच्या मनात
भारत'रत्न' ठरलं आहे
आजकालच्या पूरस्कारात फक्त
राजकारणच उरलं आहे
• रघुनाथ सोनटक्के

(४ फेब्रुवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १०)
Vatratika

रविवार, ३ फेब्रुवारी, २०१९

अर्थसंकल्प

«वात्रटिका»

अर्थसंकल्प

चांगला विकासदर गाठण्याचा 
काय 'संकल्प' सार्थ नाही ?
कसाही खर्च केला तरी
विरोधकांच्या मते 'अर्थ' नाहीं

शेतकर्‍याचे वाढवुन उत्पन्न

रोगांच्या निर्मुलनाचा 'संकल्प' आहे
पक्षांनांही कात्रीत पकडण्याचा
'डिजीटल' प्रयत्न अल्प आहे

शेतकरी, गरिब, व्यापारी छोटे

सगळ्यांना दिला 'आधार' आहे
विरोधकांना काय वाटायचे वाटू दे
नियोजन, नितीचा हा सार आहे

• रघुनाथ सोनटक्के, ८८०५७९१९०५
(२ फेब्रुवारी २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १०६)
Vatratika



शुक्रवार, १ फेब्रुवारी, २०१९

बापूंची हत्या

खरपूस • वात्रटिका

    « बापूंची हत्या »
बापू तुमची परत एकदा
हत्या झाली आहे
मनात वसलेला मरेना म्हणून
मिथ्या झाली आहे

विकृत मानसिकतेचा
निषेध करावा तेवढा कमी आहे
परत येऊ नका बापू
यांची अजून कुठे हमी आहे!

सत्य आणि अहिंसेचा
मार्ग यांनी पुसला आहे
विकृतपणाच्या कळसाने
मेंदू यांचा नासला आहे
• रघुनाथ सोनटक्के

(१ फेब्रुवारी २०१९ दै. मराठवाडा संचार मधे प्रकाशित, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १०५)
Vatratika Vatratika

बुधवार, ३० जानेवारी, २०१९

गरिबी हटाव

खरपूस • वात्रटिका

   « गरिबी हटाव »
प्रत्येकजणाला वाटते 
आपल्याला गरिबीची लागन आहे
श्रीमंत होण्यासाठी सांगा
कोणतं निघालं साबण आहे!

प्रत्येकातल्या 'गरिबी'ला
वचननाम्यात हळूच साद असते
काम झालं कि एकदाचं
हेतुपूरस्पर मग ती बाद असते

आवाज गरिबाचा कुणी ऐकेना 
नेहमीच तो मागत असतो
प्रत्येकजण कैवारी असल्यागत
छातीठोकपणे वागत असतो
• रघुनाथ सोनटक्के

( जानेवारी २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १०३)
Vatratika

राजकारण

खरपूस • वात्रटिका

« राजकारण »
कुणाचा संघर्ष आहे
कुणाची यात्रा आहे
वेगवेगळ्या प्रवाहांची
राजकारण ही जत्रा आहे

रंगारंगाच्या पताका, झेंडे
वेगवेगळे फेटे आहेत
सम-विषम, डावे-उजवे
स्वंयघोषीत नेते आहेत

भ्रमित करणारे मुद्दे अन्
कार्यकर्त्यांची फौज आहे
अस्मितेचा चाबूक हाणत
नेतेमंडळीची मौज आहे
• रघुनाथ सोनटक्के

(३० जानेवारी २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १०२)
३० जानेवारी २०१९ च्या दै. पथदर्शी, प्रीतीसंगम, मराठवाडा संचार, वाचकमंच, बलशाली भारत मधे प्रकाशित 


VatratikaVatratikaVatratikaVatratikaVatratika

मंगळवार, २९ जानेवारी, २०१९

सौदा

« सौदा »

एका एका जागेसाठी म्हणे
घासघीस अन् सौदा आहे
कधी तडजोड होते तर 
कधी पेच नवा पैदा आहे

भिजत राहू द्यावं घोगंडं
कुणाचाच फायदा नाही
शत्रू तर नाही म्हणायला
मित्रत्वाचाही वायदा नाही

पावलं पडतात दिशेने
पण मधेच घोडं अडतं
सगळ्याचं तिकडेच लक्ष
लग्न यांच कधी जुळतं!

• रघुनाथ सोनटक्के

( जानेवारी २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १०२)
 फेब्रुवारी २०१९ च्या मराठवाडा संचार मधे प्रकाशित

Vatratika Vatratika

सोमवार, २८ जानेवारी, २०१९

आठवण

« आठवण »

देशासाठी आपल्या दिली 
आहूती ज्या थोरांनी
आठवण ठेवावी त्यांची
आजकालच्या पोरांनी

हिंसा, अहिंसेच्या बळावर
काहींना फाशी, कुणी दिले प्राण
सलाम त्यांना आमचा
गाऊन आपले राष्ट्रगाण

तिरंगा फडकत राहू दे
उंच गगनी दिमाखात
शान वाढवू आम्ही त्याची
राहून एकतेच्या सुत्रात
• रघुनाथ सोनटक्के


(२८ जानेवारी २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १०१)
Vatratika


रविवार, २७ जानेवारी, २०१९

देशभक्ती

« देशभक्ती  »


Calligraphy by Raghunath Sontakke


स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे
आता उरलेत कुठे भक्त
आपआपसात भांडून
होईल का देश सशक्त

दहशतवाद, गरिबी, अन् महागाई
कुणी देतो अस्मितेच्या हाका
राजकारणासाठी जाती-धर्म
हाच तर आहे खरा धोका

तिरंग‍ा छातीला लावणारे
नेहमीच आपले झेंडे मिरवतात
प्रजासत्ताक अन् स्वातंत्र्यदिन सोडून
बाकी तोच कित्ता गिरवतात
   • रघुनाथ सोनटक्के
     मो. 8805791905
ईबुक: https://goo.gl/aY6hVB

१२ ऑगस्ट २०१८ च्या दै. जनशक्ती (मुंबई) मधे प्रकाशित
२६ जानेवारी २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १००
२६ जानेवारी २०१९ च्या दै. पथदर्शी, औरंगाबाद केसरी, व दै. मराठवाडा संचार मधे प्रकाशित  


Janashakti Mumbai Vatratika  Vatratika
VatratikaVatratika

शुक्रवार, २५ जानेवारी, २०१९

घराणेशाही

खरपूस • वात्रटिका

« घराणेशाही »
हातात हात घालून
भावा-बहिणीचा संग आहे
उभारी घ्यायला पक्ष
घराणेशाहीतच दंग आहे

आजोबा, पणजोबा
आणि आता नात आहे
दशकानुदशके पकडलेली 
नेहमीचीच ही वाट आहे

मु्द्दे घेवून भांडायला
कार्यकर्ताही 'प्रिय' आहे
'सोनिया'चा दिवस पाहण्यास
सत्ता एकमात्र ध्येय आहे
• रघुनाथ सोनटक्के

(५ जानेवारी २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )
Vatratika

गुरुवार, २४ जानेवारी, २०१९

वासनेचे पुजारी

वासनेचे पुजारी

फाशीच द्या त्यांना आता
जे आहेत वासनेचे 'पुजारी'
गोळ्या घाला त्या श्वापदांना
जे घालतात माणसांच्या विजारी

वाळीत टाका त्या प्रवृतींना
जे समजतात नुसतं खेळणं
भावना, जिवाशी प्रतारणा
षंढ जे जाणतात फक्त पळणं

• रघुनाथ सोनटक्के

(३ जानेवारी २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )
Vatratika

मंगळवार, २२ जानेवारी, २०१९

जपुन वापरा पाणी

जपुन वापरा पाणी 
असलं मुबलक जरी
जपुन वापरा पाणी
पाण्यासाठी वणवण करताना 
दिसु नये कुणी

'पाणी अडवा, पाणी जिरवा'
करू नका नुसती 'म्हण'
खोल जातंय दिवसेदिवस
जबाबदार अ‍ाहोत प्रत्येकजण

कार धुणे, नळ खुले
असा अपव्यय करणे टाळा
पाण्यासाठी होतात भांडणे
सोडवावीत किती वेळा

मुलभुत गरज आपली
सरकारने सोडवावी जोमाने
करू एकमेंका सहकार्य 
जगु भारतीय म्हणुन मानाने

• रघुनाथ सोनटक्के


दि  १ मे  २०१८  आणि ७,  ऑगस्ट २०१८ च्या 'युवा छत्रपती' (वात्रटिका क्रं. ९६) या लातूरच्या दैनिकात प्रकाशित
२२ जानेवारी २०१९ च्या दै. औरंगाबाद केसरी, प्रीतीसंगम मधे प्रकाशित
२३ जानेवारी २०१९ च्या दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित
२४ जानेवारी २०१९ च्या दै. बलशाली भारत (अहमदनगर) मधे प्रकाशित
२५ जानेवारी २०१९ च्या दै. पथदर्शी (धुळे) मधे प्रकाशित



 Raghunath Sontakke Vatratika

Vatratika Vatratika Vatratika



सोमवार, २१ जानेवारी, २०१९

आघाडीचा जश्न

« आघाडीचा जश्न »

निवडणूकपूर्व सगळ्यांकडून 
आघाडीचा जश्न आहे
नंतर त्यातले किती उरतील
हाच खरा प्रश्न आहे!

बळ एकवटून यांना फक्त
जागा जोडायच्या आहेत
कुणी आहे चिंतेत अजूनही
कुणाला किती सोडायच्या हेत!

• रघुनाथ सोनटक्के (पुणे)  मो. ८८०५७९१९०५
(१ जानेवारी २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ५ )
Vatratika