रविवार, ३१ मार्च, २०१९

राजकारणातील ज्येष्ठ

खरपूस • वात्रटिका

« राजकारणातील जेष्ठ »
जेष्ठांच्या वाणीला
बसलाय आता चाप
बोट धरून शिकलेल्यांनी
गप्प केला बाप
सल्ला, पद, प्रचार
हातात काहीच उरलं नाही
कमळासारखं लाल तेजही
आता त्यांच्यात उरलं नाही

• रघुनाथ सोनटक्के

(३० मार्च २०१९ चा दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १५१ व मराठवाडा संचार मधे प्रकाशित)

५ एप्रिल २०१९ च्या दै. बलशाली भारत मधे प्रकाशित
Vatratika  Vatratika Vatratika

शुक्रवार, २९ मार्च, २०१९

पळापळ

« पळापळ »
बाप इकडून लढतो
पुत्र तिकडून लढतो आहे
एकाच घरातला प्रत्येकजण
उंदरावाणी पळतो आहे

दुसर्‍या पक्षातले नाराज
कोण कुठे गळाला आहे
नेत्यांची पिलावळ वर

कार्यकर्ता मात्र तळाला आहे
• रघुनाथ सोनटक्के

(२९ मार्च २०१९ चा दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १५१)
Vatratika
 

संपत्तीत वाढ

खरपूस • वात्रटिका

« संपत्तीत वाढ »

कुणाची गतीने वाढली
कुणाची कोटीने वाढली
जनतेला गरिब ठेवून
यांची मात्र पटीने वाढली

'गरिबी हटाव' आधीही होता
आताही तोच नारा आहे
जनतेला साद घालायला
जुमलेबाजांचा खेळ सारा अाहे

• रघुनाथ सोनटक्के
(
२८ मार्च २०१९ चा दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १५०)
२९ मार्च २०१९ च्या दै. बलशाली भारत आणि मराठवाडा संचार मधे प्रकाशित
Vatratika  Vatratika  Vatratika
शब्दरसिक दिवाळी अंक: http://bit.ly/ShabdRasik-2018
शब्दरसिक चॅनेल: https://www.youtube.com/c/ShabdRasik

मंगळवार, २६ मार्च, २०१९

दुष्काळाच्या झळा

« दुष्काळाच्या झळा »
शेतकरी सोसतोय
दुष्काळाच्या झळा
राज्यकर्ते मात्र गुंग
वेळ नाही थोडा

गुरांना चारा नाही
माणसांना पाणी मिळेना
कामाची पडली वानवा
काय करावं कळेना

पोशिंदा जगाचा शेतकरी
पिकाचा भाव पडत राहतो
निवडणुकीपुरता वापर
बाकीवेळेला सडत राहतो
• रघुनाथ सोनटक्के
(२७ मार्च २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.१४८)
  २६ मार्च २०१९ च्या दै. मराठवाडा संचार मधे प्रकाशित 
Vatratika

सोमवार, २५ मार्च, २०१९

मित्रपक्षांचा सन्मान


« मित्रपक्षांचा सन्मान »
जानकर भी सबकुछ त्यांनी
मित्रांचा गुंडाळला गाशा
दिलेल्या शब्दावर समाधान
वर सन्मानाची भाषा
वाट पाहण्याशिवाय हाती
आता काही उरलं नाही
सत्तेच्या दासांना तर
काव्यही नवं स्फुरलं नाही
• रघुनाथ सोनटक्के

 
२५ मार्च २०१९, दै. युवा छत्रपती वात्रटिका क्रं. १४७
गुगल सर्च: 'kharpus vatratika'


Vatratika

रविवार, २४ मार्च, २०१९

आरोपांच्या फैरी

« आरोपांच्या फैरी »
निवडणूकीच्या तोंडावरच
आरोपांच्या फैरी झडत असतात
एरवी सन्मान करणारेही
वैर्‍यासारखे लढत असतात

केलेल्या आरोपांचा त्या
निकाल कधीच लागत नाही
रणधूमाळीनंतर त्यांचा
हिशेब कुणीच मागत नाही

आरोपांच्या हल्ल्याने मतदार
विचलित केल्या जातो
एकवेळ 'शिक्का' बसल्यावर
त्याला 'ठेंगा' दिल्या जातो
• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
  मो. 
८८०५७९१९०५
 
२३ मार्च २०१९, दै. युवा छत्रपती वात्रटिका क्रं. १४६
Vatratika
 

शनिवार, २३ मार्च, २०१९

राजकारणाचा तंबू

« राजकारणाचा तंबू »

पोरं-सून, नातू,
जावाई आणि साले
अख्खेच कुटूंब
राजकारणात आले

बायको, मुलगा, बाप
हरेकाचा पक्ष वेगळा
राजकारणाचा तंबू
यांनी व्यापला सगळा
 • रघुनाथ सोनटक्के
गुगल सर्च: 'kharpus vatratika'
 (२२ मार्च २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.१४

शुक्रवार, २२ मार्च, २०१९

निवडणूकीचे रंग

निवडणूकीचे रंग

निवडणूकाच्या मोसमाने
रंग आता भरला आहे
बापाचा-लेकाने भिन्नपक्षाचा
संग बघा धरला आहे

रोज हरेक नव्या रंगात

कुणी रंगबदलू सरडा आहे
स्वार्थी राजकारणापायी
कार्यकर्त्याचा मात्र भरडा आहे
• रघुनाथ सोनटक्के
गुगल सर्च: 'kharpus vatratika'

 

 ( मार्च २०१९, दै. युवा छत्रपती वात्रटिका क्रं.१४
२३ मार्च २०१९ च्या बलशाली भारत आणि मार्चच्या मराठवाडा संचार मधे प्रकाशित 

बुधवार, २० मार्च, २०१९

द्वंद

द्वंद  
 
'मै भी, मै भी' चे
द्वंद रंगले आहे
दाखवलेले स्वप्नं म्हणे
त्यांचे भंगले आहे

चोर पोलिसाच्या खेळाला
आॅनलाईनची जोड आहे
कुणी मारतो सिक्सर
कुणी तोडीस तोड आहे

 • रघुनाथ सोनटक्के
गुगल सर्च: 'kharpus vatratika'
 (२० मार्च २०१९, दै. युवा छत्रपती वात्रटिका क्रं.१४३
Vatratika

सोमवार, १८ मार्च, २०१९

मित्रपक्षांची आठवण

« मित्रपक्षांची आठवण »

युती झाल्यावर दोघांनाही
इतर भाऊ 'आठवले' नाही
मित्रपक्षांचा सोयीस्कर विसर
साधे निमंत्रणही पाठवले नाही!

गर्दी जमवली तरच जागा
शेवटची आता तंबी आहे
उमेदवार घोषीत होतातच
यादी अजून खूप लंबी आहे!
 • रघुनाथ सोनटक्के
गुगल सर्च: 'kharpus vatratika'
 (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.१४
मार्च २०१९ च्या बलशाली भारत आणि मराठवाडा संचार मधे प्रकाशित
Vatratika

जनतेचा कौल


« जनतेचा कौल » 

कुणी घेतली माघार
कुणी लढणार आहे
जनतेचा कौल कुणाला?
नंतरच कळणार आहे

दिलेली बक्कळ आश्वासने
कुणी किती पाळली आहे
वचननाम्यावरची धूळ
पुसून परत काढली आहे

कुणाचे कुठल्या, कुणाचे कुठल्या 
जागेवर घोडे अडले आहे
एकाच्या बदल्यात दुसर्‍याने
जागेवर पाणी सोडले आहे
• रघुनाथ सोनटक्के (पुणे)

(१८ मार्च २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.१४१)
Vatratika

शुक्रवार, १५ मार्च, २०१९

पहिली यादी

खरपूस • वात्रटिका

« पहिली यादी »
कुणी आहे चाणक्य
कुणी आहे गुरू
याद्यामधून मोहरे
काढणे झाले सुरू

पहिल्या यादीत ज्येष्ठ
नामी चेहरे दिसतात
तरूणांना संधी म्हणून
घरातलेच असतात

वरून नाखुश दाखवायचे
आतून मात्र होकार असतो
दूधाला जाऊन भांडे लपवण्याचा
तसलाच हा प्रकार असतो

• रघुनाथ सोनटक्के
गुगल सर्च: 'kharpus vatratika'
 
(दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.१३८) 

१६ मार्च २०१९ च्या बलशाली भारत आणि मराठवाडा संचार मधे प्रकाशित

गुरुवार, १४ मार्च, २०१९

घराणेशाहीचा शाप

खरपूस • वात्रटिका

   « घराणेशाहीचा शाप »
 
विरोधी म्हणून त्यांचे
वार खुप तिखे अाहेत
सत्तेसाठी एकाच घरात
दोन पक्षाचे विखे आहेत

बालहट्टापुढे भलेभले
सहज वाकले आहेत
सारे पक्ष घराणेशाहीने
असेच व्यापले आहेत

राजकारणाला देशात
घराणेशाचा शाप आहे
एका पक्षात मुलगा
दुसऱ्या पक्षात बाप आहे

  
कार्यकर्त्यांच्या इच्छेने(!)
पोरापोरींना थोपले जाते
घराणेशाहीच्या नावाने
 लोकशाहीला विकले जाते
• रघुनाथ सोनटक्के
गुगल सर्च: 'kharpus vatratika'
 
(दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.१३७)

१४ मार्च २०१९ दै. मराठवाडा संचार व दै. बलशाली भारत मधे प्रकाशित

 

बुधवार, १३ मार्च, २०१९

घोटाळे आणि अपहार


खरपूस • वात्रटिका
 
« घोटाळे आणि अपहार »

अटी शिथिल करणे जणू
भ्रष्टाचाराचा स्वभाव असतो
लागेबांधे पूरक ठरतात
तर यंत्रणेवर दबाव असतो

कमकुवतांच्या पोषणासाठी
योजनांचा सल्ला असतो
न्यायालयाची चपराक बसूनही
निधीवर यांचा डल्ला असतो

घोटाळे आणि अपहार
नाळ यांची पक्की आहे
कधी फकवतात खिचडी
तर कधी फक्त चिक्की आहे

• रघुनाथ सोनटक्के

गुगल सर्च: 'kharpus vatratika'

(दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.१३७)
१३ मार्च २०१९ दै. मराठवाडा संचार व दै. बलशाली भारत मधे प्रकाशित

मंगळवार, १२ मार्च, २०१९

बॅंकेचे चोर

खरपूस • वात्रटिका
 
« बॅंकेचे चोर »
निरव, मल्ल्या, चोक्सी
विदेशात पळतो आहे
मिशीवर ताव मारून
आपल्याला छळतो आहे

कोण किती लुटलं
आणखी किती चोर आहेत
आरोप-प्रत्यारोपातच
आपले नेते थोर आहेत
• रघुनाथ सोनटक्के

गुगल सर्च: 'kharpus vatratika'
(दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.१३६)
१२ मार्च २०१९ च्या दै. मराठवाडा संचार मधे प्रकाशित
१३ मार्च २०१९ दै. बलशाली भारत मधे प्रकाशित

सोमवार, ११ मार्च, २०१९

जागेवर दावा

खरपूस • वात्रटिका

« जागेवर दावा »
एकाच जागेवर डोळा
किती जणांचा दावा आहे
प्रत्येकजण इथे इच्छूक
निष्ठावंतांचीही हवा आहे

कुणाचा रेटून दबाव
कुणाला पांठिंबा थोडा आहे
खायला टपलेल्यांना
उमदेवारीचा हा गोळा आहे
• रघुनाथ सोनटक्के
गुगल सर्च: 'kharpus vatratika'

११ मार्च च्या मराठवाडा संचार, बलशाली भारत मधे प्रकाशित
(दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.१३५)

शनिवार, ९ मार्च, २०१९

कार्यकर्ता

खरपूस • वात्रटिका

« कार्यकर्ता »
नेहमीच कामाला लागण्याचा
कार्यकर्त्यांना सल्ला असतो
पद, लाभांवर एकमात्र
वरच्यांचाच डल्ला असतो

पक्षवाढीसाठी अतोनात
तोच एकटा झटत असतो
पक्षाला तर केवळ बिचारा
पखालीचा बैलच वाटत असतो
• रघुनाथ सोनटक्के
गुगल सर्च: 'kharpus vatratika'

(९ मार्च २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.१३४)
Vatratika

शुक्रवार, ८ मार्च, २०१९

सुत्र

खरपूस • वात्रटिका

« सुत्र »
पुर्वीचे कट्टर शत्रूत्व
आता मित्रत्व झाले आहे
सत्तेसाठी काहीही शक्य
आजचे सूत्र झाले आहे

गठबंधन, युती, आघाडी
एकी साधण्याचा मामला आहे
काल ज्यावर चिखल फेकला
आज तोच फार चांगला आहे
• रघुनाथ सोनटक्के

(दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.१३३)
गुगल सर्च: 'kharpus vatratika'


गुरुवार, ७ मार्च, २०१९

बलिदानाचं श्रेय

खरपूस वात्रटिका

« बलिदानाचं श्रेय »

नेतृत्व खमकं असलं की 
आगळीकेला चाप असतो 
नाहीतर समंजसपणाच्या नावाखाली 
दिरंगाईचा श्राप असतो 

कर्तृत्व आहे सैनिकांचे
श्रेय कुणी लाटू नये
सर्वोच्च बलिदानावर
दुकान आपले थाटू नये

कुणाला शंका ‍आहे
राजकारण आता तापले आहे
बलिदानालाही मिडियाने
टिआरपीमधे मापले आहे

• रघुनाथ सोनटक्के

(दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.१३१)
गुगल सर्च: 'kharpus vatratika'
५ मार्च २०१९ च्या दै. मराठवाडा संचा मधे प्रकाशित 
Vatratika Vatratika

बुधवार, ६ मार्च, २०१९

खोटेपणा

खरपूस • वात्रटिका

« खोटेपणा »
राजकारणात खोटं बोलणं
आता नित्याचच झालं आहे
खर्‍याला किंमत कुठेय
मरण सत्याचच झालं आहे

एक खोटा दुसर्‍याची 
दुसरा त्याची खोलत असतो
आपलंच खरं ठरवायला
खालची पातळी धरत असतो

दावे-प्रतिदाव्यांनी दोघे
एकमेकांना भीडत असतात
काही महाभाग मधेच मग
अकलेचे तारे तोडत असतात
• रघुनाथ सोनटक्के
गुगल सर्च: 'kharpus vatratika'

(दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.१३)
७ मार्च २०१९ च्या दै. मराठवाडा संचा मधे प्रकाशित
Vatratika

संवेदनशिलता

« संवेदनशिलता »

ना शेतकर्‍याच्या मालाला भाव
ना जीवाला मोल आहे
कधी घेतो टांगून झाडाला
बुडलांय कर्जात खोल आहे

त्याचा टाहो ऐकणारे सरकार
देतील मेल्यावर मदत, निधी
विरोधकांचं होईल भांडवल
अन् पार पडेल त्याचा अंत्यविधी

त्याच्या नावानं होत राहतील
अशाच यात्रा आणि आंदोलंनं
केल्या जातील मोठया तरतुदी
अन् तो जात राहील जीवानं

   • रघुनाथ सोनटक्के
   मो. 8805791905

ईबुक: https://goo.gl/aY6hVB

(दै. युवा छत्रपती ६ मार्च २०१९, वात्रटिका क्रं.१३१)
Vatratika

शुक्रवार, १ मार्च, २०१९

पाकवर स्ट्राईक

खरपूस • वात्रटिका

« पाकवर स्ट्राईक »

आत घुसून पाकड्यांची
नांगी कशी ठेचली आहे
शांतीवार्तेची अक्कल
आता त्याला सुचली आहे

एवढे जेरीस आणूनही
पोकळ त्याच्या धमक्या आहेत
आत घुसून मारणार्‍या
फौजा आमच्या खमक्या आहेत

इकडे कुरापती, तिकडे वार्ता
दुतोंडी त्याची चाल आहे
ना'पाक' असलेल्यांची 
आखरी हीच एक ढाल आहे
• रघुनाथ सोनटक्के
(दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं.१२८)
गुगल सर्च: 'kharpus vatratika'

१ मार्च २०१९ च्या दै. बलशाली भारत  मार्च च्या दै. मराठवाडा संचारमधे प्रकाशित 

Vatratika Vatratika Vatratika